
IPO GMP | Awifs स्पेस सोल्युशन्स या वर्कप्लेस सोल्यूशन प्रदाता कंपनीचा IPO 22 मे रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या कंपनीच्या IPO ला ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. ग्रे मार्केटमध्ये Awifs स्पेस सोल्युशन्स कंपनीचा IPO 43 टक्के प्रीमियम म्हणजेच 165 रुपये वाढीसह ट्रेड करत आहे. या कंपनीच्या IPO ची इश्यू किंमत 364-383 रुपये निश्चित करण्यात आली आहे. ( Awifs स्पेस सोल्युशन्स कंपनी अंश )
ग्रे मार्केट प्रीमियम आणि प्राइस बँडनुसार या कंपनीचा IPO स्टॉक 548 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. Awifs स्पेस सोल्युशन्स कंपनीच्या IPO चा आकार 599 कोटी रुपये आहे. या कंपनीचा IPO 22 मे ते 27 मे दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या IPO अंतर्गत कंपनीने 128 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश शेअर्स इशू केले आहे. यासह IPO मध्ये 1.23 कोटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विकले जाणार आहेत.
Awifs स्पेस सोल्युशन्स कंपनीने ICICI सिक्युरिटीज लिमिटेड, Axis Capital Limited, IIFL Securities Limited आणि MK Global Financial Services Limited यांना IPO इश्यूचे व्यवस्थापक म्हणून नियुक्त केले आहे. ही कंपनी IPO मधून जमा होणारा पैसा नवीन केंद्रांची स्थापना करण्यासाठी आणि कंपनीच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी खर्च करणार आहे.
Awifs स्पेस सोल्युशन्स कंपनीने IPO च्या एका लॉटमध्ये 39 शेअर्स ठेवले आहेत. याचा अर्थ गुंतवणूकदार एका लॉटमध्ये किमान 39 इक्विटी शेअर्स खरेदी करू शकतात. या कंपनीचे शेअर्स गुरुवार दिनांक 30 मे 2024 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केले जातील. Awifs स्पेस सोल्युशन्स कंपनी 2014 साली स्थापन करण्यात आली होती. Awifs स्पेस सोल्युशन्स कंपनीची भारतातील विविध शहरांमध्ये 169 केंद्रे कार्यरत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.