
Hot Stocks | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारातील मिडकॅप निर्देशांक मजबूत तेजीत वाढत आहे. मागील 11 ट्रेडिंग सेशनपासून या मिडकॅप इंडेक्समध्ये दररोज नवीन विक्रम पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी आता दर्जेदार शेअर्स खरेदी करून होल्ड केले पाहिजे.
यासाठी काही शेअर बाजार तज्ञांनी अल्प ते दीर्घ मुदतीकरता गुंतवणूक करण्यासाठी टॉप 3 मिडकॅप स्टॉक निवडले आहेत. हे शेअर्स खरेदी करून तुम्ही मजबूत कमाई करू शकता. चला तर जाणून घेऊ या शेअर्सबद्दल सविस्तर माहिती.
Huhtamaki :
तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील 9-12 महिन्यांमध्ये या कंपनीचे शेअर्स 418 रुपये किमतीवर जाऊ शकतात. आज सोमवार दिनांक 27 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.59 टक्के घसरणीसह 305.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीचे देशभरात 16 उत्पादन युनिट आहेत. 2024 या वर्षात या कंपनीचे शेअर्स 5 टक्के आणि मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 17 टक्के वाढले होते.
स्पेशालिटी रेस्टॉरंट्स :
तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील 9-12 महिन्यांमध्ये या कंपनीचे शेअर्स 235 रुपये किमतीवर जाऊ शकतात. आज सोमवार दिनांक 27 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.36 टक्के घसरणीसह 179.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीचे 134 आउटलेट कार्यरत आहेत. जे भारताव्यतिरिक्त लंडन, दुबई आणि ओमानमध्येही चालू आहेत. कंपनीकडे सध्या 170 कोटी रुपये कॅश इन हॅण्ड आहे. मागील 3 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 25 टक्के घसरले होते.
Grindwell नॉर्टन :
तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील 9-12 महिन्यांमध्ये या कंपनीचे शेअर्स 2650 रुपये किमतीवर जाऊ शकतात. आज सोमवार दिनांक 27 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.74 टक्के घसरणीसह 2,333 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ही कंपनी लाइफ सायन्सेस आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी सेगमेंटची पूर्तता करते. मागील दोन आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढले आहेत. तर मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 13 टक्के आणि तीन महिन्यांत 11 टक्के वाढले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.