Kross IPO | कमाईची मोठी संधी! क्रॉस लिमिटेड कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार, IPO तपशील जाणून घ्या

Kross IPO | क्रॉस लिमिटेड या ऑटो पार्टस बनवणाऱ्या कंपनीचा IPO लवकरच बाजारात येऊ शकतो. सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही क्रॉस लिमिटेड कंपनीच्या IPO वर लक्ष ठेवू शकता. क्रॉस लिमिटेड कंपनी लवकरच IPO च्या माध्यमातून 500 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याची योजना आखत आहे. IPO साठी या कंपनीने सेबीकडे प्राथमिक कागदपत्रे सबमिट केली आहेत.
कंपनीच्या DRHP नुसार झारखंडमधील जमशेदपूर या ठिकाणी स्थित असलेली क्रॉस लिमिटेड कंपनी आपल्या IPO मार्फत 250 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विकणार आहे. ऑफर फॉर सेल अंतर्गत कंपनीचे प्रवर्तक सुधीर राय 168 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स आणि अनिता राय 82 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स खुल्या बाजारात विकून नफा वसुली करणार आहेत. क्रॉस लिमिटेड कंपनी आपल्या आयपीओपूर्वी 50 कोटी रुपये मूल्याच्या शेअर्सची प्रायव्हेट प्लेसमेंट करू शकते. असे झाल्यास आयपीओचा आकार कमी होईल.
क्रॉस लिमिटेड कंपनी आपल्या IPO च्या फ्रेश इश्यूमधून जमा होणाऱ्या 70 कोटी रुपये रकमेचा वापर मशिनरी आणि उपकरणे खरेदी करण्यासाठी खर्च करणार आहे. त्याचप्रमाणे कंपनी आपल्या 90 कोटी रुपये मूल्याच्या कर्जाचीही परतफेड देखील करणार आहे. उर्वरित रक्कम कंपनी सामान्य कॉर्पोरेट हेतूंवर खर्च करणार आहे.
मार्च 2023 तिमाहीत क्रॉस लिमिटेड कंपनीने 154.2 टक्क्यांच्या वाढीसह 30.93 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर याच आर्थिक वर्षात कंपनीने 64.3 टक्के वाढीसह 488.6 कोटी रुपये ऑपरेशनल महसूल संकलित केला आहे. याच कालावधीत कंपनीचा EBITDA 184 bps च्या मार्जिन विस्तारासह 11.77 टक्क्यांच्या वाढीसह 95 टक्केवर पोहोचला आहे. तर कंपनीचा एकूण EBITDA 57.5 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Kross IPO GMP Today 04 December 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vedanta Share Price | 600 रुपये टार्गेट प्राईस, वेदांता शेअरमध्ये तेजीचे संकेत, सध्या 437 रुपयांवर ट्रेड करतोय - NSE: VEDL
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये तेजी, पण स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ - NSE: RELIANCE
-
Vedanta Share Price | 560 रुपये टार्गेट प्राईस, प्रभुदास लिलाधर वेदांता शेअर्सवर बुलिश, संधी सोडू नका - NSE: VEDL
-
IREDA Share Price | टॉप ब्रोकरेज फर्मने दिले संकेत, शेअर प्राईस उसळी घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
-
IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, टार्गेट नोट करा - NSE: IREDA
-
Suzlon Share Price | कंपनीला मिळाला नवीन कॉन्ट्रॅक्ट, सुझलॉन शेअर्स तेजीत, अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Suzlon Share Price | स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी दिले संकेत, BUY रेटिंग सह पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: SUZLON
-
NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करतोय, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPC
-
TATA Motors Share Price | मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेजने दिले संकेत, अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
-
Vedanta Share Price | वेदांता शेअरमध्ये तेजी, कंपनीबाबत अपडेट आली, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: VEDL