
Adani Power Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच अदानी पॉवर कंपनीने मिर्झापूर थर्मल एनर्जी पॉवर यूपी लिमिटेड या कंपनीचे अधिग्रहण केले आहे. बुधवारी अदानी पॉवर स्टॉक 749 रुपये किमतीवर ओपन झाला होता. त्यानंतर हा स्टॉक 7 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 779 रुपये किमतीवर पोहचला होता.
अदानी पॉवर कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीला कळवले आहे की, मिर्झापूर थर्मल एनर्जी पॉवर यूपी लिमिटेड ही कंपनी आता अदानी पॉवर कंपनीची उपकंपनी बनली आहे. या कंपनीतील 99.8 टक्के भाग भांडवल अदानी पॉवर कंपनीने खरेदी केले आहे. आज शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी अदानी पॉवर स्टॉक 1.10 टक्के वाढीसह 757.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मिर्झापूर थर्मल एनर्जी पॉवर यूपी लिमिटेड कंपनी पूर्वी अदानी इन्फ्रा इंडिया कंपनीची उपकंपनी होती. बुधवारी बीएसईमध्ये अदानी पॉवर स्टॉक 0.32 टक्क्यांच्या वाढीसह 726.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. सोमवारी 3 जून रोजी या कंपनीच्या शेअर्सने 896.75 रुपये ही उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. मागील एका वर्षात अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 180 टक्क्यांनी वाढवले आहेत.
अदानी पॉवर कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अल्पावधीत दुप्पट केले आहेत. मागील 6 महिन्यांत अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 35 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 20 टक्क्यांनी वाढली आहे. अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 896.75 रुपये होती. या कंपनीचे बाजार भांडवल 280071.72 कोटी रुपये आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.