
Tata Technologies Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. विशेषतः 4 जून नंतर शेअर बाजारात एक वेगळीच गति पाहायला मिळत आहे. अशा काळात जर तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी दर्जेदार स्टॉक शोधत असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. तज्ञांच्या मते, सध्या टाटा टेक्नॉलॉजीज आणि टाटा पॉवर स्टॉकमध्ये गुंतवणूकीची मजबूत संधी निर्माण झाली आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने या दोन्ही स्टॉकमध्ये 27 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. ( टाटा टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्सची इश्यू किंमत 500 रुपये होती. आणि लिस्टिंगच्या दिवशी हा शेअर 1,314.25 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील आठवड्यात शुक्रवारी टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक 1,050 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज सोमवार दिनांक 10 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.057 टक्के वाढीसह 1,062 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ब्रोकरेज फर्मच्या मते, टाटा टेक्नॉलॉजी कंपनीला ऑटो इंजिनीअरिंग आणि रिसर्च आणि डेव्हलपमेंट सेगमेंटमधील तेजीचा फायदा होऊ शकतो. डिजिटल इंजिनीअरिंगचा वाढता प्रभाव आणि आउटसोर्सिंग डेस्टिनेशन म्हणून भारताची अनुकूल स्थिती या सर्व बाबी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीसाठी अनुकूल आहे. ICICI सिक्युरिटीज फर्मच्या मते, टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक 1,330 रुपये किमतीवर जाऊ शकतो. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 27 टक्के वाढू शकतो.
ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजच्या मते टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स पुढील काळात 490 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज सोमवार दिनांक 10 जून 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 2.86 टक्के वाढीसह 456.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. टाटा पॉवर कंपनी एक मोठा अक्षय ऊर्जा प्लॅटफॉर्म तयार करणार आहे.
या कंपनीने आतापर्यंत 10 GW नूतनीकरणयोग्य मालमत्ता, 4 GW सौर उत्पादन क्षमता आणि एक EPC आर्म आणि रूफटॉप सोलर डिव्हिजनची उभारणी केली आहे. ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर स्टॉकला बाय रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.