20 May 2024 12:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, लवकरच गुंतवणूक दुप्पट होणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी आणि टाटा पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राइस जाहीर Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना मजबूत व्याज देणाऱ्या 5 बँकांच्या FD योजना, मिळेल 9.60% पर्यंत व्याज IRFC Share Price | IRFC स्टॉकच्या टेक्निकल चार्टवर राऊंडिंग बॉटम पॅटर्न, शेअर्स BUY करावे की Sell? Mutual Fund SIP | केवळ 5,400 रुपयांची SIP बचत करोडमध्ये परतावा देईल, अशी करा गुंतवणूक SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल
x

Piccadily Agro Share Price | दारूच्या ग्लासात दारू ओतून पैसा संपतो, या दारू कंपनीच्या शेअर्समध्ये पैसा ओता, करोडपती व्हाल, रोज अप्पर सर्किट

Piccadily Agro Share Price

Piccadily Agro Share Price | पिकाडिली अॅग्रो या हरियाणा स्थित मद्य उत्पादक कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत धावत आहेत. जगातील सर्वोत्तम व्हिस्की ब्रॅण्ड बनवणारी कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिकाडिली अॅग्रो कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करत आहेत. एकेकाळी या कंपनीचे शेअर्स 25 पैशांवर ट्रेड करत होते, तर आता हा स्टॉक 270 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

पिकाडिली अॅग्रो स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 99080000 रुपये नफा कमावून दिला आहे. मागील 16 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 98,080 टक्के परतावा मिळवून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 12 ऑक्टोबर 2023 रोजी पिकाडिली अॅग्रो स्टॉक 9.98 टक्के वाढीसह 269.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

स्टॉक वाढीचे कारण
जेव्हापासून पिकाडिली अॅग्रो कंपनीच्या Indri Diwali Collector’s Edition 2023 ब्रँडला जगातील सर्वोत्कृष्ट सिंगल माल्ट व्हिस्कीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे, तेव्हापासून या कंपनीचे शेअर्स प्रचंड तेजीत वाढत आहेत. मागील आठ ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स दुप्पट वाढले आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 236.40 रुपये किमतीवर ओपन झाले होते. तर आज हा स्टॉक 10 टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे.

मागील 5 दिवसात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के नफा कमावून दिला आहे. तर माहिल 15 दिवसांत पिकाडिली अॅग्रो स्टॉक 114 टक्के वाढला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1129 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.

सहा महिन्यांपूर्वी ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 5.09 लाख रुपये झाले आहे. मागील सहा महिन्यात पिकाडिली अॅग्रो स्टॉक 457 टक्के मजबूत झाला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे साडेसहा पट अधिक वाढले आहे.

अवघ्या एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 551 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. ज्या लोकांनी पाच वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 1816 टक्के वाढले आहे. त्यावेळी या कंपनीचे शेअर्स फक्त 12.81 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

पिकाडिली अॅग्रो कंपनीच्या इंद्री दिवाळी कलेक्शन एडिशन 2023 ला व्हिस्की ऑफ द वर्ल्डने जगातील सर्वोत्कृष्ट व्हिस्की ब्रँड म्हणून पुरस्कार दिला आहे. भारतीय श्रेणीतील या व्हिस्कीने 100 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय ब्रँड्सला स्पर्धेत मागे टाकून हा पुरस्कार पटकावला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Piccadily Agro Share Price today 12 October 2023.

हॅशटॅग्स

Piccadily Agro Share Price(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x