 
						Refex Industries Share Price | रेफेक्स इंडस्ट्रीज या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 11576 टक्के नफा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी 10 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये एक लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 1 कोटींपेक्षा जास्त झाले आहे. 7 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 151.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1600 कोटी रुपये आहे. ( रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
मार्च 2024 अखेरपर्यंत रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 55.28 टक्के भाग भांडवल धारण केले होते. आणि सार्वजनिक गुंतवणूकदारांनी कंपनीचे 44.72 टक्के भाग भांडवल धारण केले होते. आज सोमवार दिनांक 10 जून 2024 रोजी रेफेक्स इंडस्ट्रीज स्टॉक 2.44 टक्के वाढीसह 155.50 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. 6 जून 2014 रोजी रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 1.3 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 7 जून 2024 रोजी हा स्टॉक 151.80 रुपये किमतीवर पोहचला आहे.
मागील 10 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 11576 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 20,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 23.35 लाख रुपयांपेक्षा जास्त झाले असते. जर तुम्ही 2014 मध्ये रेफेक्स इंडस्ट्रीज स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.16 कोटी रुपये झाले असते.
5 जून 2020 रोजी रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 10.6 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 4 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1332 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 4 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 50,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 7.16 लाख रुपये झाले असते. जर तुम्ही या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 14.32 लाख रुपये झाले असते.
जानेवारी-मार्च 2024 या तिमाहीत रिफॅक्स इंडस्ट्रीज कंपनीने 342.34 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तर मागील वर्षी याच तिमाहीत रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीने 630.12 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मार्च 2023 तिमाहीत रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीने 50.66 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर मार्च 2024 तिमाहीत या कंपनीने 33.37 कोटी रुपये नफा कमावला होता.
संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-2024 मध्ये रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीचा एकत्रित महसूल 1182.87 कोटी रुपये नोंदवला गेला होता. जो आर्थिक वर्ष 2023 मध्ये 1629.14 कोटी रुपये होता. संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-2024 मध्ये या कंपनीचा निव्वळ नफा 93 कोटी रुपयेवर गेला आहे, जो मागील आर्थिक वर्षात 116 कोटी रुपये नोंदवला गेला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		