27 July 2024 10:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा HUDCO Share Price | मल्टिबॅगर शेअरसाठी BUY रेटिंग, कंपनीबाबत अपडेट आली, यापूर्वी 400% परतावा दिला
x

Bonus Share News | अशी संधी सोडू नका! फ्री बोनस शेअर्स मिळतील, शेअरने 2 दिवसात 18% परतावा दिला

Bonus Share News

Bonus Share News | ओबेरॉय हॉटेल्सची मालकी असलेल्या ईआयएच असोसिएटेड हॉटेल्स या कंपनीचे शेअर्स सोमवारी 17 टक्के वाढीसह 845 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहे. ईआयएच असोसिएटेड हॉटेल्स कंपनीने 14 जून 2024 रोजी आपल्या संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. ( ईआयएच असोसिएटेड हॉटेल्स कंपनी अंश )

या बैठकीत कंपनीचे संचालक आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेऊ शकतात. आज मंगळवार दिनांक 11 जून 2024 रोजी ईआयएच असोसिएटेड हॉटेल्स स्टॉक 0.41 टक्के वाढीसह 823 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ईआयएच असोसिएटेड हॉटेल्स ही कंपनी ओबेरॉय ग्रुपचा एक भाग आहे. मार्च 2024 ला संपलेल्या तिमाहीत या कंपनीने 40.66 टक्के वाढीसह 36.81 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत ईआयएच असोसिएटेड हॉटेल्स कंपनीने 26.17 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील 6 महिन्यांत ईआयएच असोसिएटेड हॉटेल्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 80 टक्के परतावा कमावून दिला आहे.

11 डिसेंबर 2023 रोजी ईआयएच असोसिएटेड हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 470.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 10 जून 2024 रोजी हा स्टॉक 845 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील 3 महिन्यांत ईआयएच असोसिएटेड हॉटेल्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 35 टक्केपेक्षा जास्त वाढवले आहेत. 13 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 638.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 845 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 418.55 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Share News on EIH Associated Hotels Share Price 11 June 2024.

हॅशटॅग्स

Bonus Share News(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x