12 December 2024 6:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO
x

NHPC Share Price | NHPC शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - Maharashtranama Marathi

NHPC Share Price

NHPC Share Price | एनएचपीसी म्हणजेच नॅशनल हायड्रोपॉवर इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. नुकताच एनएचपीसी कंपनीने (NSE: NHPC) भारत सरकारच्या ऊर्जा विभागासोबत सामंजस्य करार केला आहे. यामध्ये कंपनीला महाराष्ट्रात एकूण 7,350 मेगावॅट क्षमतेच्या अक्षय ऊर्जा स्त्रोतांसह ऊर्जा संचयन प्रणाली आणि पंप स्टोरेज सिस्टीम्सच्या स्थापनेचे काम देण्यात आले आहे. (नॅशनल हायड्रोपॉवर इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन कंपनी अंश)

गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी या कंपनीचे शेअर्स 0.43 टक्के घसरणीसह 98.33 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी एनएचपीसी स्टॉक 2.25 टक्के घसरणीसह 96 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. एनएचपीसी या सरकारी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 98,772 कोटी रुपये आहे. ही कंपनी निफ्टी मिडकॅप 100 इंडेक्सचा भाग आहे.

जून तिमाहीत एनएचपीसी कंपनीचे एकूण उत्पन्न 2,417.88 कोटी रुपये नोंदवले गेले होते. या काळात कंपनीचा निव्वळ नफा 1023.51 कोटी रुपये नोंदवला गेला होता. चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांनी एनएचपीसी स्टॉकवर108 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 94 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. मेहता इक्विटीज लिमिटेड फर्मच्या तज्ञांच्या मते, या स्टॉकला 101 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार मिळत आहे. तसेच या स्टॉकने 95 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, एनएचपीसी स्टॉक 101.50 रुपयेच्या पार गेला तर हा स्टॉक 115-118 रुपये किमतीवर जाऊ शकतो. मात्र गुंतवणूकदारांनी 90 रुपयेच्या खाली स्टॉप-लॉस लावणे आवश्यक आहे. एनएचपीसी कंपनीच्या संचालक मंडळाने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सवर 0.50 पैसे अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. हे लाभांश वाटप करण्यासाठी कंपनीने 12 ऑगस्ट 2024 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला होता.

News Title | NHPC Share Price NSE: NHPC 06 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

NHPC Share Price(32)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x