20 May 2024 1:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | चिल्लर प्राईस टॉप 10 पेनी स्टॉक, अल्पावधीत मालामाल करणारा परतावा मिळू शकतो IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, लवकरच गुंतवणूक दुप्पट होणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी आणि टाटा पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राइस जाहीर Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना मजबूत व्याज देणाऱ्या 5 बँकांच्या FD योजना, मिळेल 9.60% पर्यंत व्याज IRFC Share Price | IRFC स्टॉकच्या टेक्निकल चार्टवर राऊंडिंग बॉटम पॅटर्न, शेअर्स BUY करावे की Sell? Mutual Fund SIP | केवळ 5,400 रुपयांची SIP बचत करोडमध्ये परतावा देईल, अशी करा गुंतवणूक
x

PKH Ventures IPO | सुवर्ण संधी! पीकेएच वेंचर IPO लाँच होणार, गुंतवणूक करून फायदा घेण्यासाठी कंपनी तपशील वाचा

PKH Ventures IPO

PKH Ventures IPO | सध्या जर तुम्ही इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच IPO मध्ये पैसे गुंतवून कमाई करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. 30 जून 2023 रोजी पासून पीकेएच वेंचर कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे.

बांधकाम आणि हॉस्पिटॅलिटी फर्म पीकेएच वेंचर कंपनीने या आठवड्यात आपला IPO लाँच करण्याची तयारी केली आहे. 30 जून ते 4 जुलैपर्यंत तुम्ही या IPO मध्ये गुंतवणूक करू शकतात. पीकेएच वेंचर कंपनीने आपल्या IPO स्टॉक इश्यूची किंमत बँड 140-148 रुपये जाहीर केली आहे.

IPO चे तपशील

पीकेएच वेंचर कंपनी आपल्या IPO मध्ये 1.82 कोटी फ्रेश इक्विटी शेअर्स जारी करणार आहे. यासोबत कंपनीचे प्रवर्तक प्रवीण कुमार अग्रवाल आपले 73.73 लाख शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विकणार आहे. पीकेएच वेंचर कंपनी आपल्या IPO द्वारे खालच्या किंमत बँडवर 358.85 कोटी रुपये अप्पर किंमत बँडवर 379.35 कोटी रुपये भांडवल उभारणीचा प्रयत्न करणार आहे.

फ्रेश शेअर्स इश्यूमधून जमा होणाऱ्या एकूण रकमेतून पीकेएच वेंचर कंपनी 124.12 कोटी रुपये जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी खर्च करणार आहे. याशिवाय 80 कोटी रुपये पीकेएच वेंचर कंपनी आपली उपकंपनी गरुड कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये गुंतवणुकीसाठी खर्च करणार आहे.

कंपनीच्या दीर्घकालीन खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी 40 कोटी रुपये खर्च करणार आहे. उर्वरित रक्कम व्यापार वाढ आणि इतर धोरणात्मक उपक्रम आणि सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी खर्च केले जाणार आहे. आयडीबीआय कॅपिटल मार्केट्स अँड सिक्युरिटीज कंपनी पीकेएच वेंचर कंपनीच्या आयपीओचे बुक-रनिंग लीड मॅनेजर म्हणून जबाबदारी पार पडणार आहे. या कंपनीचा IPO स्टॉक BSE आणि NSE इंडेक्सवर सूचीबद्ध केला जाईल.

कंपनीबद्दल थोडक्यात

पीकेएच वेंचर ही मुंबई स्थित कंपनी बांधकाम आणि व्यवस्थापन, आदरातिथ्य आणि व्यवस्थापन सेवा या क्षेत्रात व्यवसाय करते. ही कंपनी बांधकाम प्रकल्पांमध्ये निवासी आणि व्यावसायिक इमारती आणि विविध प्रकल्पांचे काम करते. या कंपनीने दिल्ली पोलिस मुख्यालय, आणि जलविद्युत प्रकल्प, अमृतसर आणि नागपूरमधील फूड पार्क यासारखे मोठे प्रकल्प पूर्ण केले आहेत.

पीकेएच वेंचर कंपनी दोन हॉटेल्स चालवते. अॅम्बी व्हॅली, लोणावळा या ठिकाणी पीकेएच वेंचर कंपनीने रिसॉर्ट आणि स्पा सुरू केले आहेत. पीकेएच वेंचर ही कंपनी झेब्रा क्रॉसिंग, मुंबई साल्सा आणि हार्डीज बर्गर यांसारख्या प्रसिद्ध ब्रँड अंतर्गत रेस्टॉरंट्स देखील चालवत आहे. यासह पीकेएच वेंचर कंपनी क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट्स चालवण्याचे काम देखील करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | PKH Ventures IPO is ready to launch check details on 28 June 2023.

हॅशटॅग्स

PKH Ventures IPO(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x