
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीने नुकताच माहिती दिली आहे की, कंपनीने त्यांचा वाहन वित्तपुरवठा युनिट टाटा कॅपिटल या नॉन-बँकिंग वित्तीय कंपनीमध्ये शेअर स्वॅपडीलद्वारे विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा समूहाचा भाग असलेली टाटा कॅपिटल ही कंपनी वित्तीय सेवा आणि वाहन कर्ज तसेच गृह आणि शैक्षणिक कर्ज देण्याचा व्यवसाय करते. हा करार पूर्ण झाल्यानंतर टाटा मोटर्स कंपनी विलीन झालेल्या संस्थेमध्ये 4.7 टक्के वाटा धारण करेल. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स सोमवारी 0.43 टक्क्यांच्या वाढीसह 974.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात टाटा मोटर्स स्टॉक 6.90 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. YTD आधारे टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 23.29 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. आज मंगळवार दिनांक 11 जून 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 1.47 टक्के वाढीसह 989.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
मार्च 2024 मध्ये टाटा मोटर्स कंपनीने आपले व्यावसायिक वाहन व्यवसाय त्याच्या पॅसेंजर वाहन व्यवसाय दोन वेगळ्या सूचीबद्ध कंपन्यांमध्ये विभागले जाईल, अशी घोषणा केली होती. यामधे सर्वात फायदेशीर विभाग हा जग्वार लँड रोव्हर व्यवसाय असेल. टेक्निकल चार्टवर टाटा मोटर्स स्टॉकने 950 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे.
शेअर बाजारातील तज्ञांनी टाटा मोटर्स स्टॉक खरेदी करताना 917 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावून 1,110 रुपये टार्गेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा मोटर्स स्टॉक पुढील काळात 1,020 रुपये किमतीवर जाऊ शकतो. खालच्या पातळीवर या स्टॉकने 950 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. मार्च 2024 पर्यंत टाटा मोटर्स कंपनीच्या प्रवर्तकांकडे कंपनीचे 46.36 टक्के भाग भांडवल होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.