
IRFC Share Price | आयआरएफसी म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. अल्पावधीत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 75 टक्के परतावा कमावून दिला होता. हा स्टॉक 200 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किंमत पातळीपेक्षा 26 रुपये कमी किमतीवर ट्रेड करत आहे. 3 जून 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 200 रुपये किमतीवर पोहचला होता. आज मंगळवार दिनांक 11 जून 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 1.98 टक्के वाढीसह 176.44 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी अंश )
23 जानेवारी 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 192.8 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मात्र नंतर हा स्टॉक विक्रीच्या दबावात अडकला होता. आता शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी या स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. तज्ञांच्या मते, आयआरएफसी स्टॉक पुढील काळात 190-200 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 2024 या वर्षात आयआरएफसी स्टॉकने 75 टक्के वाढ नोंदवली होती.
एप्रिल 2024 या महिन्यात आयआरएफसी स्टॉकची किंमत 10 टक्के वाढली होती. तर मे महिन्यात हा स्टॉक तब्बल 13 टक्के मजबूत झाला होता. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये आयआरएफसी स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत होता. जानेवारी 2024 हा महिना आयआरएफसी स्टॉकसाठी सर्वोत्तम महिना ठरला होता.
आयआरएफसी कंपनीचा IPO 2021 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. त्यावेळी शेअर 26 रुपये प्रति शेअर किमतीवर सूचीबद्ध झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत आयआरएफसी स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 7 पट परतावा कमावून दिला आहे. 2023 या वर्षात आयआरएफसी स्टॉक 300 टक्के पेक्षा जास्त वाढला होता. आयआरएफसी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.26 लाख कोटी रुपये आहे. केंद्र सरकारने या कंपनीचे 86.36 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.