Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल स्टॉकमध्ये ब्रेकआऊट! टेक्निकल चार्टवर या प्राईसवर मजबूत सपोर्ट

Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल या कंपनीच्या शेअर्समधे (Jio Financial Services Share Price) जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. पूर्वी रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जिओ फायनान्शिअल कंपनीने आपले JioFinance ॲप लाँच केले आहे. या ॲपच्या माध्यमातून ही कंपनी अखंडपणे डिजिटल बँकिंग, UPI व्यवहार, बिल सेटलमेंट्स, विमा सल्ला, यासारखे काम करणार आहे. ( जिओ फायनान्शिअल कंपनी अंश )
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स गुरुवारी 0.42 टक्क्यांच्या वाढीसह 362.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2024 या वर्षात जिओ फायनान्शिअल स्टॉक 54.53 टक्क्यांनी वाढला आहे. या कंपनीचे शेअर्स 394.70 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किमतीवरून 8.17 टक्क्यांनी खाली आले आहेत. आज शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी जिओ फायनान्शिअल स्टॉक 0.72 टक्के घसरणीसह 358.20 रुपये किमतींवर ट्रेड करत आहे.
जिओ फायनान्शिअल कंपनीने आपल्या भविष्यातील सेवामध्ये कर्ज सुविधाचा विस्तार करणे, म्युच्युअल फंड, गृहकर्ज, ग्राहक कर्ज पुरवठा यासारख्या सेवा सामील करण्याची योजना आखली आहे. जिओ फायनान्शिअल कंपनीने BlackRock Inc आणि BlackRock Advisors Singapore Pte Ltd कंपनीसोबत संपत्ती व्यवस्थापन आणि ब्रोकिंग व्यवसाय स्थापन करण्यासाठी 50:50 प्रमाणात संयुक्त उपक्रम स्थापन करण्याचा करार केला आहे.
टेक्निकल चार्टवर जिओ फायनान्शिअल स्टॉकने 358 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक वाढण्यासाठी शेअरने 367 रुपयेचा ब्रेकआऊट तोडणे आवश्यक आहे. एंजल वन फर्मच्या तज्ञांच्या मते, जिओ फायनान्शिअल स्टॉक 395 रुपये किमतीवरून खाली आला आहे. तज्ञांच्या मते, या स्टॉकमध्ये 370 रुपये ही किंमत ब्रेकआऊट पातळी म्हणून काम करू शकते.
रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या मते, जिओ फायनान्शिअल स्टॉक पुढील काळात 380 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 350 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, जिओ फायनान्शिअल स्टॉकने 358 रुपये किमतीवर सपोर्ट निर्माण केला आहे. या स्टॉकला 367 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार मिळत आहे. पुढील एका महिन्यासाठी या स्टॉकची अपेक्षित ट्रेडिंग रेंज 345 रुपये ते 390 रुपये असेल. मार्च 2024 पर्यंत जिओ फायनान्शिअल कंपनीमध्ये प्रवर्तकांनी 47.12 टक्के भाग भांडवल धारण केला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Jio Finance Share Price NSE Live 14 June 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | 'बाय' रेटिंग, 41 टक्के परतावा मिळेल, कमाईची अशी सुवर्ण संधी सोडू नका - NSE: SUZLON
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर खरेदी करा, 24% परतावा मिळेल, पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट, अपसाईड - डाऊनसाइड रिस्क जाणून घ्या - NSE: YESBANK
-
BEL Share Price | बिनधास्त खरेदी करावा असा शेअर, कंपनी फंडामेंटल्स मजबूत, ऑर्डरबुक सुद्धा मजबूत - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | अरिहंत कॅपिटल बुलिश, झटपट मिळेल मोठा परतावा, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
Reliance Share Price | नुवामा बुलिश, जबरदस्त तेजीचे संकेत, गुंतवणूकदारांसाठी अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
HAL Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश; मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर देईल मोठा परतावा - NSE: HAL