Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून ‘BUY’ रेटिंग, टार्गेट प्राईस पाहून गुंतवणूकदार खूप

Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 1044 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली सुरू आहे. नुकताच मायक्रोसॉफ्ट आणि टाटा टेक्नॉलॉजीची प्रवर्तक कंपनी टाटा मोटर्सने इनोव्हेंट हॅकाथॉनची दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन करण्यासाठी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स तेजीत आले होते. ( टाटा टेक्नॉलॉजी कंपनी अंश )

2024 या वर्षात टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक 13 टक्के घसरला आहे. याच काळात बेंचमार्क निफ्टी-50 निर्देशांकात 8 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. आज गुरूवार दिनांक 20 जून 2024 रोजी टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक 1.73 टक्के घसरणीसह 1,009.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत 2024 मध्ये टाटा टेक कंपनीचे हॅकाथॉन जनरेटिव्ह एआय-सक्षम नवकल्पनांवर लक्ष केंद्रित करेल, जे उत्पादन अभियांत्रिकी, उत्पादन आणि ग्राहक अनुभवासह उत्पादन विकास शृंखलेमध्ये मूल्य प्रदान करण्यासाठी सक्षम असतील.

या उपक्रमाचा उद्देश संपूर्ण भारतातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी उत्पादन उद्योगातील आव्हानांना तोंड देणारी सर्जनशीलता आणि नवकल्पनांचे दर्शन करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करणे आहे. टाटा टेक कंपनीने हे हॅकाथॉन तिसऱ्या आणि चौथ्या वर्षाच्या अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुले केल्याची घोषणा केली आहे. याचे मुख्य उद्दिष्ट स्केलेबल सोल्यूशन्स विकसित करणे, आणि आवश्यक तंत्रज्ञानासह टॉप प्रकल्प संघांना एकत्रित करणे आहे.

मायक्रोसॉफ्ट कंपनीने आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, मायक्रोसॉफ्ट आणि टाटा समूहासोबत करण्यात आलेल्या या सहकार्याद्वारे तरुणाना जनरेटिव्ह AI चा फायदा घेऊन नवीन उपाय विकसित करण्यासाठी आणि त्यांच्या कल्पनांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे.

मार्च 2024 तिमाहीत टाटा टेक कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात 27.3 टक्के घट झाली आहे. याकाळात कंपनीने 157 कोटी रुपये नफा कमावला आहे. मार्च तिमाहीत टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा ऑपरेशन्समधील महसूल 7.2 टक्क्यांच्या घसरणीसह 1,301 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी टाटा टेक स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. तज्ञांनी या स्टॉकवर 1,330 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली होती. ब्रोकरेज फर्मने टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा महसूल 2025-26 मध्ये 13-18 टक्के, आणि ROE 23-25 टक्के, आणि EPS 23 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Technologies Share Price NSE Live 20 June 2024.