RVNL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, ऑर्डरबुक मजबूत झाली, पुन्हा मल्टिबॅगर?

RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स मंगळवारी चार टक्क्यांच्या वाढीसह 405 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित घसरण पहायला मिळाली आहे. नुकताच या कंपनीला 160 कोटी रुपये मूल्याची एक ऑर्डर मिळाली आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )

या ऑर्डर अंतर्गत आरव्हीएनएल कंपनीला ड्युअल MSDAC, ऑटोमॅटिक ब्लॉक सिंगलिंग सिस्टीम, जाखापुरा नेरगुंडी, खुर्दा रोड भुसंदपूर आणि भुसंदपूर गोलंथरा विभागातील ईस्ट कोस्ट रेल्वेच्या खुर्दा रोड विभागाचे काम देण्यात आले आहे. हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कंपनीला 24 महिन्याची मुदत देण्यात आली आहे. आज गुरूवार दिनांक 20 जून 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 0.87 टक्के घसरणीसह 387.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

जून महिन्याच्या सुरुवातीला आरव्हीएनएल कंपनीला NTPC कंपनीने 495.15 कोटी रुपये मूल्याचे काम दिले आहे. यामध्ये आरव्हीएनएल कंपनीला रामम जलविद्युत प्रकल्पाच्या स्टेज-3 शी संबंधित काम देण्यात आले आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कंपनीला 66 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. आरव्हीएनएल कंपनीला दक्षिण पूर्व रेल्वे विभागाने देखील 38.5 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे.

YTD आधारे आरव्हीएनएल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 120 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 255 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मार्च 2024 तिमाहीत आरव्हीएनएल कंपनीने 33.2 टक्के वाढीसह 478.6 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. याच तिमाहीत कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर 17.4 टक्के वाढून 6714 कोटी रुपयेवर पोहचला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 20 June 2024.