
Alok Industries Share Price | आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स बुधवारी 10 टक्के वाढीसह 29.97 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवारी देखील या कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, भारत सरकार वस्त्रोद्योगात पीएलआय योजनेची व्याप्ती वाढवण्याची तयारी करत आहे. पीएलआय योजनेची व्याप्ती वाढवण्याच्या बातमीमुळे आलोक इंडस्ट्रीज स्टॉक तेजीत आला आहे. ( आलोक इंडस्ट्रीज कंपनी अंश )
मीडिया रिपोर्टनुसार भारत सरकार देशातील कापड उद्योग क्षेत्रासाठी 11,000 कोटी रुपये मूल्याच्या कापड उत्पादनाशी संबंधित प्रोत्साहन योजनेअंतर्गत टी-शर्ट आणि इनरवेअर सारख्या उत्पादनांचा समावेश करू शकते. याशिवाय या योजनेंतर्गत कापड कंपन्यांना प्लांट उभारण्यासाठी 3 वर्षांपेक्षा जास्त मुदत दिली जाऊ शकते. आज शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी आलोक इंडस्ट्रीज स्टॉक 0.39 टक्के वाढीसह 28.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन जुलै महिन्यात आपला सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी नवीन निधीची तरतूद करण्याची अपेक्षा आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत आलोक इंडस्ट्रीज कंपनीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने 40.01 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर जेएम फायनान्शियल अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने या कापड कंपनीचे 34.99 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने आलोक इंडस्ट्रीज कंपनीमध्ये 3,300 कोटी रुपये गुंतवणूक केली होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.