12 December 2024 7:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
x

No Penalty SIP | तुम्ही म्युच्युअल फंडाच्या SIP मध्ये गुंतवणूक करता?, आता खात्यात पुरेसे पैसे नसले तरी नो टेन्शन, दंड भरण्याची गरज नाही

No Penalty SIP

No Penalty SIP | म्युच्युअल फंड SIP चा नवीन नियम आला आहे. तुम्ही म्युचुअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक करत असल्यास, ठराविक तारखेला गुंतवणुकीसाठी खात्यात पुरेसे पैसे नसल्यास, आता कोणताही दंड लागणार नाही. ज्या खात्यातून ठराविक तारखेला एसआयपीमध्ये पैसे स्वयंचलितपणे हस्तांतरित करून गुंतवणूक केली जाते, त्या खात्यात आवश्यक रक्कम शिल्लक नसल्यास, तुम्हाला कोणताही दंड आकारला जाणार नाही.

नो-पेनल्टी एसआयपी:
जर तुम्ही म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे गुंतवणूक केली, तर तुम्हाला याची जाणीव असेलच की जोडलेल्या खात्यात आवश्यक गुंतवणुकीसाठी पुरेशी रक्कम नसल्यास, तुम्हाला दंड आकारला जातो. या संदर्भात, स्वदेशी निओ-बँकिंग आणि वित्तीय सेवा प्लॅटफॉर्म ज्युपिटरने एक विशेष उपाय म्हणजे नो-पेनल्टी SIP योजना सादर केली आहे. यामध्ये, जर काही कारणास्तव तुमच्या म्युचुअल फंड एसआयपीशी जोडलेले खाते, म्हणजेच ज्या खात्यातून ठराविक तारखेला तुमची एसआयपीमध्ये गुंतवणूक स्वयंचलितपणे हस्तांतरित केले जातात, त्या खात्यात आवश्यक शिल्लक रक्कम नसल्यास, दंड आकारला जाणार नाही. यालाच म्हणतात नो-पेनल्टी SIP. ही योजना शून्य-कमिशन डायरेक्ट म्युच्युअल फंड गुंतवणुकीमध्ये लागू असेल.

पूर्वी आकारला जाणारा दंड 750 रुपये :
जर समजा तुम्ही म्युचुअल फंड एसआयपी ची पेमेंट करण्यात अयशस्वी झालात, म्हणजे त्याच्याशी संबंधित खात्यात निर्दिष्ट तारखेला एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक असलेली पुरेशी शिल्लक रक्कम नसेल तर बँका तुम्हाला 250 ते 750 रुपये पर्यंत दंड आकारतात. प्रत्येक वेळी एसआयपी पेमेंट अयशस्वी झाल्यास तुम्हाला हा दंड भरावा लागेल. नो-पेनल्टी एसआयपीमध्ये, गुंतवणूकदार हा दंड भरण्यास बांधील नसतो. आणि बँक खात्यात जर अपुरी रक्कम असल्यास, एसआयपीमधील गुंतवणूक आपोआप थांबते आणि आणि शिल्लक जमा झाल्यावर खात्यातून गुंतवणूक पुन्हा सुरू होते.

डायरेक्ट म्युच्युअल फंडाची वैशिष्ट्ये :
ज्युपिटरने सादर केलेल्या डायरेक्ट म्युच्युअल फंड योजनामध्ये, पहिल्यांदाच नो-पेनल्टी SIP सारखे महत्त्वाचे वैशिष्ट्य सादर करण्यात आले आहे. यामध्ये जेर तुमच्या म्युचुअल फंड शी लिंक असलेल्या बँक खात्यात पुरेशी शिल्लक रक्कम नसल्यास, SIP तात्पुरता वेळेसाठी आपोआप बंद होईल. तुम्ही फक्त एका स्वाइपने SIP गुंतवणूक नियंत्रित करू शकता. तुम्हाला कोणत्याही महिन्यात म्युचुअल फंड SIP पेमेंट भरायची नसेल किंवा SIP पूर्णपणे बंद करायची असेल तर तुम्ही ते फक्त एका स्वाइपने करू शकता. डायरेक्ट म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्याने वार्षिक 1.5 टक्क्यांपर्यंत कमिशनची बचत करू शकता आणि त्यामुळे तुमचा परतावाही वाढेल. जर तुम्ही कोणत्याही दिवशी दुपारी २ च्या आधी गुंतवणूक केली तर तुम्हाला त्या दिवसाची (NAV) निव्वळ मालमत्ता मूल्य मिळेल जी ज्युपिटर अॅपवर दिसते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | No Penalty SIP on mutual fund investment If you skip payment on 11 August 2022.

हॅशटॅग्स

No Penalty SIP(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x