
Tata Technologies Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये अस्थिरता पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी या स्टॉकवर ‘सेल’ रेटिंग देऊन प्रॉफिट बुक करण्याचा सल्ला दिला आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक 2 टक्के घसरणीसह 1,012 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ( टाटा टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
आज देखील हा स्टॉक किंचित घसरणीसह ट्रेड करत आहे. मागील पाच दिवसांत या कंपनीच्या शेअर्सची किमंत 5 टक्के घसरली आहे. आणि सहा महिन्यांत टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक 15 टक्के कमजोर झाला आहे. आज शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक 0.64 टक्के घसरणीसह 1,003.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक 1,400 रुपये या आपल्या उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 30 टक्के खाली आला आहे. या कंपनीचे शेअर्स 500 रुपये या IPO किमतीच्या तुलनेत दुप्पट वाढीसह सूचीबद्ध झाले होते. मागील सात महिन्यापैकी सहा महिन्यांत या कंपनीचे विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्सची त्याची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1,400 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 982.25 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 41,033.37 कोटी रुपये आहे.
टाटा टेक्नोलॉजी लिमिटेड ही एक भारतीय बहुराष्ट्रीय उत्पादन अभियांत्रिकी कंपनी आहे. ही कंपनी मुख्यतः अभियांत्रिकी आणि डिझाइन, उत्पादन व्यवस्थापन, उत्पादन, उत्पादन विकास आणि ऑटोमोटिव्ह आणि एरोस्पेस मूळ उपकरण उत्पादक तसेच औद्योगिक यंत्रसामग्री कंपन्यांना सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. टाटा टेक्नॉलॉजी ही कंपनी मुख्यतः ऑटोमोटिव्ह उद्योग, औद्योगिक अवजड यंत्रसामग्री, एरोस्पेस उद्योग आणि शिक्षण उद्योग, या चार औद्योगिक क्षेत्रात कार्यरत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.