 
						IRB Infra Share Price | आयआरबी इंफ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सने 2024 या वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 60 टक्के परतावा कमावून दिला आहे. जानेवारी ते एप्रिल महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने शानदार कामगिरी केली होती. अवघ्या काही महिन्यात या स्टॉकची किंमत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 2021 नंतर या स्टॉकने केलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. संपूर्ण 2021 या वर्षात आयआरबी इंफ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 91 टक्के परतावा कमावून दिला होता. ( आयआरबी इंफ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
सध्या या कंपनीचे शेअर्स चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, सेंट्रम ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांनी आयआरबी इंफ्रास्ट्रक्चर स्टॉक 75 रुपये किमतीवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आज मंगळवार दिनांक 25 जून 2024 रोजी आयआरबी इंफ्रास्ट्रक्चर स्टॉक 0.090 टक्के घसरणीसह 66.26 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. तज्ञांनी हा स्टॉक 63 रुपये किमतीच्या खाली खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
पुढील सहा महिन्यात या कंपनीचे शेअर्स 85 रुपये किंमत स्पर्श करू शकतात, अशी अपेक्षा तज्ञांनी व्यक्त केली आहे. टेक्निकल चार्टवर आयआरबी इंफ्रास्ट्रक्चर स्टॉक 65.44 रुपये या आपल्या 100 दिवसांच्या मूव्हिंग सरासरी किमतीच्या वर ट्रेड करत आहे. मात्र 68.1 रुपये या 50 दिवसांच्या मूव्हिंग सरासरी किमतीच्या खाली ट्रेड करत आहे.
नुकताच स्पॅनिश इन्फ्रा कंपनी फेरोव्हियलने आपल्या सिंट्रा या उपकंपनीच्या माध्यमातून आयआरबी इंफ्रास्ट्रक्चर कंपनीतील आपले 1,920 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स विकले आहेत. फेरोव्हियल कंपनीने मार्च तिमाहीत सिंट्रा कंपनीच्या मध्यामतून आयआरबी इंफ्रास्ट्रक्चर कंपनीचे 24.86 टक्के भाग भांडवल धारण केले होते. आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये आयआरबी इंफ्रास्ट्रक्चर कंपनीची टोल वसुली 20-25 टक्के वाढण्याची अपेक्षा आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		