
Yes Bank Share Price | सध्या BSE सेन्सेक्स इंडेक्स 79,243.18 अंकावर पोहचला आहे. तर निफ्टी-50 इंडेक्स 24,044.50 अंकावर पोहचला आहे. अशा काळात येस बँक, आयटीसी, आणि अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहेत. StoxBox फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी हे तीन शेअर्स निवडले आहेत. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सची सविस्तर माहिती.
येस बँक :
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, या स्टॉकला 28-30 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार मिळत आहे. या स्टॉकने 22 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. तेजीत वाढण्यासाठी या स्टॉकने 24.50 रुपये किंमत पार करणे आवश्यक आहे. सध्या हा स्टॉक आपल्या 100-दिवसांच्या मूव्हिंग सरासरी किमतीच्या वर ट्रेड करत आहे. जर या स्टॉकने 28 रुपये किमतीवर ब्रेकआऊट दिला तर शेअर अल्पावधीत 30 रुपये किमतीवर जाऊ शकतो. शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी हा स्टॉक 1.11 टक्के वाढीसह 23.77 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
अदानी पॉवर :
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, हा स्टॉक 780 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार देत आहे. या स्टॉकने 675 रुपये किमतीवर सपोर्ट निर्माण केला आहे.जर हा स्टॉक 675 रुपये किमतीच्या वर टिकला तर शेअर अल्पावधीत 780 रुपये किमतीवर जाऊ शकतो. शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी हा स्टॉक 0.18 टक्के वाढीसह 717 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
ITC :
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, हा स्टॉक 445-500 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार देत आहे. या स्टॉकने 426 रुपये किमतीवर सपोर्ट निर्माण केला आहे. जर हा स्टॉक 445 रुपये किमतीच्या वर टिकला तर शेअर अल्पावधीत 500 रुपये किमतीवर जाऊ शकतो. शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी हा स्टॉक 0.14 टक्के घसरणीसह 425 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.