
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 1.32 टक्क्यांच्या वाढीसह 358.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज हा स्टॉक मजबूत विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 53.7 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश )
21 ऑगस्ट 2023 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 42.2 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 1 जुलै 2024 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉक 1.34 टक्के घसरणीसह 353.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
शेअर बाजारातील तज्ज्ञाच्या मते, जिओ फायनान्शिअल स्टॉक खरेदी करण्यासाठी आकर्षक वाटत आहे. मात्र गुंतवणूकदारांनी हा स्टॉक दीर्घकाळासाठी होल्ड करावा, तरच उत्तम नफा मिळेल. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 0.74 टक्के घसरली आहे. तर मागील 5 दिवसात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉक 1.33 टक्के कमजोर झाला आहे.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही भारतीय वित्तीय सेवा प्रदान करणारी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीची उपकंपनी होती. मात्र आता ही कंपनी स्वतंत्रपणे शेअर बाजारात सूचीबद्ध झाली आहे. ऑगस्ट 2023 मध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स भारतीय स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध करण्यात आले होते. ही कंपनी आपल्या ग्राहकांना पेमेंट सेवा आणि विमा ब्रोकिंगसह विविध आर्थिक सेवा प्रदान करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.