
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने मागील 4 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. अवघ्या 4 वर्षात या कंपनीचे शेअर्स 1 रुपयेवरून वाढून 28 रुपये किमतीच्या पार गेले आहेत. मागील 4 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2400 टक्के परतावा कमावून दिला आहे. भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीने देखील रिलायन्स पॉवर स्टॉकमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
एलआयसी कंपनीने रिलायन्स पॉवर कंपनीचे 10 कोटींपेक्षा जास्त शेअर होल्ड केले आहेत. आज सोमवार दिनांक 1 जुलै 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 0.41 टक्के वाढीसह 29.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. 23 मे 2008 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 274.84 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किंमत पातळीपासून हा स्टॉक 99 टक्क्यांनी घसरून 27 मार्च 2020 रोजी 1.13 रुपये किमतीवर आला होता. 2020 पासून ते 28 जून 2024 रोजी या काळात रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 1.13 रुपयेवरून वाढून 28.93 रुपये किमतीवर पोहचले आहेत.
जर तुम्ही 27 मार्च 2020 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 25.60 लाखांपेक्षा जास्त झाले असते. 28 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 28.93 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 34.35 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 13.80 रुपये होती. मार्च 2024 पर्यंत एलआयसी कंपनीकडे रिलायन्स पॉवर कंपनीचे एकूण 2.56 टक्के भागभांडवल म्हणजेच 10,27,58,930 शेअर्स होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.