12 December 2024 6:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO
x

BHEL Share Price | 17 रुपयाच्या शेअरची कमाल, मागील 1 वर्षात दिला 256% परतावा, पुन्हा बंपर तेजी येणार

BHEL Share Price

BHEL Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारी बीएचईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर तेजी पाहायला मिळाली होती. आज मात्र हा स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी बीएचईएल स्टॉक तीन-चार टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला 13,300 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. ( बीएचईएल कंपनी अंश )

1 जानेवारी 1999 रोजी बीएचईएल कंपनीचे शेअर्स 17 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक 1601 टक्के वाढला आहे. आज सोमवार दिनांक 1 जुलै 2024 रोजी बीएचईएल स्टॉक 1.01 टक्के घसरणीसह 297.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

नुकताच बीएचईएल कंपनीला झारखंडमधील कोडरमा येथील दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन कंपनीकडून 13300 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डर अंतर्गत कंपनीला 1600 मेगावॅट क्षमतेच्या थर्मल पॉवर प्रकल्पाचे बांधकाम करण्याचे काम देण्यात आले आहे. बीएचईएल कंपनीने जून 2024 मध्ये दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन कंपनीच्या कोडरमा थर्मल प्लांटच्या कॉन्ट्रॅक्ट लिलावात 800 मेगावॅट क्षमतेच्या दोन पॉवर प्लांटसाठी बोली लावली होती. परंतु दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन कंपनीने या ऑर्डरबाबत अजूनही घोषणा केलेली नाही.

मागील एका वर्षात बीएचईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 256 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 557 टक्के वाढली आहे. 2024 या वर्षात बीएचईएल स्टॉक 53 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. जून 2024 च्या दुसऱ्या आठवड्यात बीएचईएल कंपनीने सेबीला कळवले होते की, त्यांना अदानी पॉवर कंपनीकडून रायपूर, छत्तीसगड येथील 2×800 मेगावॅट क्षमतेच्या सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्लांटची उभारणी करण्याची ऑर्डर मिळाली आहे. यासह कंपनीला एमटीयूपीपीएलकडून उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील थर्मल पॉवर प्लांटसाठी दुसरी ऑर्डर मिळाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BHEL Share Price NSE Live 01 July 2024.

हॅशटॅग्स

#BHEL Share Price(66)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x