
BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या नवरत्न दर्जा असलेल्या कंपनीला 3172 कोटी रुपये मूल्याची नवीन ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड कंपनीकडून मिळाली आहे. मागील शुक्रवारी बीईएल कंपनीच्या शेअर्समध्ये 0.56 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली होती. दिवसाअखेर हा स्टॉक 306.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंश )
बीईएल कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.23 लाख कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 323 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 120.70 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 2 जुलै 2024 रोजी बीईएल स्टॉक 0.33 टक्के घसरणीसह 306.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला मिळालेल्या नवीन ऑर्डरमध्ये भारतीय लष्कराच्या BMP 2/2K रणगाड्यांच्या अपग्रेडेशनसाठी प्रगत, स्वदेशी डिझाइन आणि विकसित दृश्य आणि अग्नि नियंत्रण प्रणालीचा पुरवठा करण्याचे काम देण्यात आले आहे. यामध्ये सर्वसमावेशक अभियांत्रिकी सपोर्ट पॅकेजचाही समावेश आहे. या व्यतिरिक्त बीईएल कंपनीला डॉपलर वेदर रडार, क्लासरूम जॅमर, स्पेअर्स आणि सर्व्हिसेस इत्यादींच्या पुरवठ्यासाठी 481 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर देण्यात आली आहेत. आर्थिक वर्ष 2024-2025 च्या पहिल्या तिमाहीत बीईएल कंपनीला 4803 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. ब्रोकरेज फर्म CLSA ने नुकताच बीईएल कंपनीची रेटिंग ‘बाय’ वरून कमी करून ‘आउटपरफॉर्म’ अशी केली आहे.
चालू आर्थिक वर्षात बीईएल कंपनीला 25,000 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर मिळण्याची अपेक्षा आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 156 टक्के परतावा कमावून दिला आहे. भारत सरकारने पुढील पाच वर्षांत भारतीय संरक्षण निर्यातीत 50000 कोटी रुपये लक्ष साध्य करण्याचे निश्चित केले आहे. 2024 या वर्षात भारत इलेक्ट्रॉनिक्स स्टॉक 68 टक्क्यांनी वाढला आहे. मागील 12 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 156 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.