
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्समध्ये मंगळवारी मजबूत नफा वसुली पाहायला मिळाली होती. जून तिमाहीत कंपनीचा महसूल 0.89 टक्क्यांच्या वाढीसह 417.82 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 414.13 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. जून तिमाहीत जिओ फायनान्शिअल कंपनीच्या एकत्रित नफ्यात 5.81 टक्क्यांची घसरण झाली असून कंपनीने फक्त 312.63 कोटी रुपये नफा कमावला आहे. ( जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनी अंश )
मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 331.92 कोटी नफा कमावला होता. मंगळवार दिनांक 16 जुलै 2024 रोजी जिओ फायनान्शिअल स्टॉक 2.98 टक्के घसरणीसह 344.80 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. नुकताच जिओ फायनान्शिअल कंपनीने जाहीर केलेल्या माहितीनुसार, कंपनीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून नॉन-बँकिंग वित्तीय कंपनीमधून कोअर इंवेस्टमेंट कंपनीमध्ये रूपांतरित करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यानंतर कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात वाढले होते. मागील एका महिन्यात जिओ फायनान्शिअल कंपनीच्या शेअर्समध्ये 2.16 टक्क्यांची किंचित घसरण पाहायला मिळाली होती.
एंजल वन फर्मच्या तज्ञांच्या मते, जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस स्टॉकमध्ये 395 रुपये या उच्चांक किमतीवरून मजबूत नफा वसुली पाहायला मिळाली होती. मात्र शेअरने 310-300 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. जर हा स्टॉक आपल्या सपोर्ट लेव्हलच्या वर टिकला तर पुढील काळात शेअरची किंमत 370 रुपये किमतीवर जाऊ शकते.
रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, जिओ फायनान्शिअल स्टॉक पुढील काळात 380 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 345 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,25,700.42 कोटी आहे. जे मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इण्डस्ट्रीज या फ्लॅगशिप कंपनीनंतर सर्वात जास्त आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.