
Bhatia Communication Share Price | भाटिया कम्युनिकेशन अँड रिटेल इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळाली आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह 22.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने भांडवल उभारणीची घोषणा केली आहे. मंगळवार दिनांक 16 जुलै 2024 रोजी भाटिया कम्युनिकेशन स्टॉक 4.97 टक्के वाढीसह 22.80 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( भाटिया कम्युनिकेशन कंपनी अंश )
भाटिया कम्युनिकेशन कंपनीने शनिवार दिनांक 20 जुलै 2024 रोजी आपल्या संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक भांडवल उभारणीबाबत सविस्तर चर्चा करतील. आणि त्यावर पुढील अधिकृत माहिती सेबीला कळवली जाईल. भाटिया कम्युनिकेशन कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 38.90 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 13.10 रुपये होती.
मागील पाच दिवसांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 12 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 60 टक्के वाढली आहे. तर मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 190 टक्के वाढवले आहेत. या काळात कंपनीच्या शेअर्सची किंमत 8 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.