
SBI Special FD Scheme | देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) नवीन मुदत ठेव (FD) योजना सुरू केली आहे. ‘अमृत वृष्टि’ या नावाने ही मुदत ठेव योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना 15 जुलै 2024 पासून सुरू करण्यात आली असून 31 मार्च 2025 पर्यंत डिपॉझिट करता येणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या पैशांवर वार्षिक 7.75% व्याज मिळू शकते. ही योजना भारतीय आणि एनआरआय ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. एसबीआयची ही खास एफडी योजना तुम्ही बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन, इंटरनेट बँकिंग आणि योनो अॅपच्या माध्यमातून उघडू शकता.
मॅच्युरिटी पीरियड
एसबीआयच्या अमृत सृष्टी फिक्स्ड डिपॉझिट स्कीममध्ये 444 दिवसांच्या मॅच्युरिटीवर नॉर्मल अकाउंटवर 7.25 टक्के वार्षिक व्याज मिळेल. तर, ज्येष्ठ नागरिकांना 50 बेसिस पॉईंट्स अधिक व्याज मिळणार आहे, म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना या एफडी योजनेवर 7.75% वार्षिक व्याज मिळू शकते. या एफडी योजनेवर कर्जाची सुविधाही आहे.
अमृत सृष्टी एफडी योजनेची वैशिष्ट्ये
आपण किती काळ जमा करू शकता:
15.07.2024 ते 31.03.2025
ठेव किंवा मुदत :
444 दिवस
डिपॉझिट :
किरकोळ गुंतवणूकदार 3 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेची एफडी करू शकतात. त्यात विद्यमान ठेवींचे नूतनीकरण करण्याची सुविधाही असेल. अनिवासी भारतीयही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
व्याजदर :
सर्वसाधारण खात्यासाठी वार्षिक 7.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.75 टक्के. तर बँक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एफडीवर अतिरिक्त व्याजदराची सुविधा आहे.
देय व्याज :
i) मुदत ठेव – मुदत ठेव – मासिक / मासिक त्रैमासिक/ सहामाही अंतराने स्पेशल टर्म डिपॉझिट – मॅच्युरिटीवर
ii) टीडीएस कापून ग्राहकाच्या खात्यात व्याज जमा केले जाईल
टॅक्स वजावट :
प्राप्तिकर कायद्यांतर्गत व्याज उत्पन्नावर टीडीएस लागू झाल्यास
मुदतपूर्व पैसे काढणे :
i) 5 लाख रुपयांपर्यंतच्या किरकोळ मुदत ठेवींसाठी मुदतपूर्व पैसे काढल्यास (सर्व मुदतीसाठी) 0.50 टक्के दंड आकारला जाईल.
ii) 5 लाख रुपयांपेक्षा जास्त परंतु 3 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर मुदतपूर्व पैसे काढल्यास (सर्व मुदतीसाठी) 1% दंड.
मर्यादित कालावधीची योजना
एसबीआयची अमृत दृष्टी योजना 15 जुलै 2024 ते 31 मार्च 2025 पर्यंत उपलब्ध असेल. यामध्ये तुम्हाला 444 दिवसांसाठी पैसे जमा करावे लागतील. ही योजना देशांतर्गत किरकोळ मुदत ठेवी आणि एनआरआय रुपया मुदत ठेवींवर लागू असेल. ज्यांना दीर्घ काळासाठी गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी ही योजना खूप फायदेशीर आहे. बँकेने यापूर्वी ‘अमृत कलश’ नावाची अशीच योजना सुरू केली होती. त्यावर 400 दिवसांच्या ठेवींवर 7.60 टक्क्यांपर्यंत व्याज मिळत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.