मुंबई बँक गैरव्यवहाराच्या चौकशीला गती येण्याची शक्यता | भाजपच्या अडचणीत वाढ होणार?
मुंबई, 24 नोव्हेंबर: मुंबई बँकेतील (Mumbai Bank Scam) गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश सहकार विभागाने सप्टेंबरमध्ये दिले होते. त्यामुळे मुंबई बँकेचे अध्यक्ष असलेले विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या अडचणीत वाढ झाली होती. भाजप सरकार गेल्यानंतर मुंबई बँकेतील गैरव्यवहाराचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला आहे. सहकार आयुक्तांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले यापूर्वीच दिले आहेत. तसेच चौकशीसाठी सहकार विभागातील ३ अधिकार्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. मात्र आता या चौकशीला गती येण्याची माहित सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे भाजपच्या अडचणीत प्रचंड वाढ होऊ शकते असं म्हटलं जातं आहे.
खालील बाबींची होणार चौकशी:
- बँकेला झालेल्या ४८ कोटी रुपयांच्या तोट्याची चौकशी होणार
- बँकेने शासनाच्या हमीवर साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाची चौकशी
- बँकेने दिलेल्या कॉर्पोरेट कर्ज खात्यांची चौकशी
- गृहनिर्माण संस्थांना स्वयंपूर्नविकास धोरणांतर्गत दिलेल्या कर्जाची चौकशी
- बँकेचे मुख्यालय व शाखांच्या दुरुस्तीवर झालेला खर्चाची चौकशी
- मागील पाच वर्षात संगणकीय प्रणाली अद्ययावत करणे, संगणक खरेदी यासाठी केलेल्या खर्चाची चौकशी
- भांडवलात घट होऊन ते ७.११ टक्के कसे झाले
या सर्व प्रकरणात मुंबई बँकेचे चौकशी करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. यापूर्वीही मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर आणि इतर संचालक मंडळाविरोधात भाजपचे विवेकानंद गुप्ता यांनी पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीबाबत तक्रार दाखल केली होती. खातेदारांच्या नावे परस्पर कर्ज काढल्याचाही आरोप करण्यात आला होता. तर नाबार्डनेही मुंबई बँकेच्या कर्ज वितरणात अनियमितता असल्याचा ठपका ठेवला होता. डिसेंबर २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार बँकेचे अध्यक्ष आणि विद्यमान भाजप आमदार प्रविण दरेकर यांच्या मेव्हण्याच्या खात्यावर कर्जाचा बराचसा पैसा वळता झाल्याचा आरोप झाला होता.
अंधेरीला एका खासगी कुरियर कंपनीत कुरियर बॉय म्हणून नोकरी करणारे १५ जण दीड दोन वर्षांपासून अन्यायाविरोधात दाद मागत होते. या सर्वांनी मुंबै बँक अध्यक्ष प्रविण दरेकरांचा मेव्हणा महेश पालांडेंच्या मदतीने मुंबै बँकेच्या कांदिवली ठाकूर व्हिलेज शाखेतून कर्जप्रकरणे केली. पगार कमी असतानाही क्षमतेपेक्षा अधिक रकमेची म्हणजे प्रत्येकी ३ लाखांचे कर्ज दोन दिवसांत मंजूरही झाली होती. परंतु त्यांच्या खात्यावरचा पैसा दुसऱ्यांच्या भलत्याच्याच खात्यावर वळवला गेला. यामधील काही पैसा हा दरेकरांचा मेव्हणा महेश पालांडे आणि त्याच्या पत्नीच्या खात्यावरही वळवण्यात आल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं.
News English Summary: The Department of Co-operation has ordered an inquiry into the Mumbai Bank scam. Therefore, the difficulty of Pravin Darekar, the Leader of the Opposition, who is the Chairman of Mumbai Bank, is likely to increase. The issue of malpractice in Mumbai Bank has come up once again. The government commissioner has ordered an inquiry into the matter. Also, 3 officers of co-operation department have been appointed for investigation.
News English Title: BJP Opposition Leader Pravin Darekar accused of corruption Mumbai Bank State government order for enquiry Marathi News LIVE latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News