26 April 2024 8:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

ICICI बँकेच्या माजी अध्यक्षा चंदा कोचर यांची 78 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

ICICI Bank, former ICICI Bank CEO Chanda Kochhar, Enforcement Department, Videocon

मुंबई: व्हिडीओकॉन कर्जप्रकरणात दोषी ठरलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चंदा कोचर यांच्याविरोधात ईडीने (सक्तवसुली संचालनालय) मोठी कारवाई केली आहे. ईडीने कोचर यांची एकूण 78 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. त्यामध्ये त्यांचे मुंबईतली घर आणि त्यांच्या पतीच्या कंपनीच्या काही संपत्तीचा समावेश आहे.

मर्जीतल्या लोकांचा आर्थिक फायदा केल्याप्रकरणी सीबीआयने चंदा कोचर, वेणूगोपाल धूत यांच्यासह इतर पाचजणांविरोधात गुन्हा दाखल केला. चंदा कोचर यांच्या सोबत त्यांचे पती, त्यांच्या सहकारी व्हिडीओकॉन कंपनीचे दोन युनीट आणि कोचर यांच्या न्यू पॉवर रेनेवेबल्स तसेच सुप्रीम एनर्जी या कंपन्यांचाही यामध्ये समावेश आहे.

चंदा कोचर यांच्याविरोधात २०१२ मध्ये आयसीआयसीआय बँकेकडून मिळालेल्या ३,२५० कोटींच्या कर्जाप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ICICI बँकेची कर्जदार कंपनी व्हिडीओकॉन इंडस्ट्रीजद्वारे कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या कंपनीमध्ये गुंतवणूकिबाबत घोटळ्याच्या आरोपांनंतर ऑक्टोबर २०१८ मध्ये चंदा कोचर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर बँकेकडून चंदा कोचर यांची त्यांच्या पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. याबाबत चंदा कोचर यांनी काही दिवसांपूर्वी बँकेच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं.

२००९ मध्ये चंदा कोचर यांनी आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर असताना नियम डावलून तसेच पदाचा गैरवापर करत वेणूगोपाल धूत यांच्या व्हिडिओकॉन उद्योगसमूहाला ३०० कोटींचे कर्ज दिले होते. ज्यानंतर धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या व्यवसायात ६४ कोटी रुपयांचे भांडवल गुंतवले. आता या सगळ्या प्रकरणी चंदा कोचर यांच्या घरासह एकूण ७८ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

 

Web Title:  Enforcement Department seized property worth rupees 78 crore of former ICICI Bank CEO Chanda Kochhar.

हॅशटॅग्स

#Banks(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x