
Tata Technologies Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने नुकताच आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. जून तिमाहीत कंपनीची कामगिरी कमजोर राहिली आहे. कंपनीची महसूल वाढ आणि मार्जिन तज्ञांच्या अपेक्षेपेक्षा कमी नोंदवली गेली आहे. ( टाटा टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
स्थिर चलन अटींमध्ये टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा महसूल तिमाही दर तिमाही आधारावर 1.9 टक्के घसरणीसह 152.1 दशलक्ष डॉलर्सवर आला आहे. शुक्रवार दिनांक 19 जुलै 2024 रोजी टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक 1.11 टक्के घसरणीसह 997.90 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणजेच EBITDA 18.2 टक्के नोंदवला गेला आहे. कंपनीने आपल्या आउटसोर्सिंग, सल्लागार शुल्क आणि कर्मचारी खर्चावर लक्ष केंद्रीत केल्याने मार्जिनमध्ये फारसे बदल झालेले नाही. नुकताच टाटा टेक कंपनीने 5 नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळवले आहे. यामध्ये 2 कॉन्ट्रॅक्ट व्यावसायिक वाहनांसाठी असून, 1 कॉन्ट्रॅक्ट बॅटरीसाठी आणि एक करार एरोस्पेस क्षेत्राशी संबंधित आहे. Vinfast ही व्हिएतनाम स्थित इलेक्ट्रिक कार कंपनी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या 5 सर्वात मोठ्या क्लायंटपैकी एक होते. मात्र मागील काही वर्षापासून ही कंपनी आर्थिक संकटांमध्ये अडकली आहे. नुकताच टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या व्यवस्थापनाने एअरबस प्रकल्पाच्या आधारे एरोस्पेस विभागात चांगल्या कामगिरीचे संकेत दिले आहेत.
याशिवाय कंपनीने सॉफ्टवेअर डिफाइन्ड व्हेईकलचा अवलंब व्यावसायिक वाहन विभागात सुरू केला आहे. या विभागाशी संबंधित 2 नवीन कॉन्ट्रॅक्ट कंपनीने मिळवले आहेत. टाटा टेक कंपनी आपल्या प्रमुख विभागातील नवीन कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून नुकसान भरून काढण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा महसूल वाढीचा अंदाज कमजोर वाटत आहे. याच काळात कंपनीचा महसूल आणि प्रति शेअर कमाई म्हणजेच EPS अनुक्रमे 11 टक्के आणि 14.4 टक्के CAGR दराने वाढण्याचा अंदाज आहे.
आर्थिक वर्ष 2025-2026 मधील कमाईच्या अंदाजानुसार टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक सध्या 47.3x च्या PE वर ट्रेड करत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सध्या या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी थोडी प्रतीक्षा करणे फायदेशीर ठरू शकते. प्रमुख आर्थिक धोके आणि मोठ्या ग्राहकांवर कंपनीचे वाढलेले अवलंबित्व, OEM टियर-1 पुरवठादारांद्वारे ऑटोमोटिव्ह ERD खर्चात झालेली कपात टाटा टेक कंपनीसाठी खूप मोठी जोखीम ठरू शकते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.