
IRFC Share Price | आयआरएफसी म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. 26 जुलै रोजी या कंपनीचे शेअर्स 184 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किमतीवरून 20 टक्के खाली आले आहेत. प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी अंश )
आयआरएफसी ही सरकारी कंपनी रेल्वे प्रकल्पांना वित्तीय सहाय्य करण्याचा आणि मालमत्ता खरेदीसाठी वित्तपुरवठा करण्याचा व्यवसाय करते. या कंपनीची आर्थिक कामगिरी पाहून तज्ञांनी हा स्टॉक 12 ते 15 महिने होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 29 जुलै 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 3.14 टक्के वाढीसह 189.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
आयआरएफसी स्टॉक हा भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या मल्टीबॅगर रेल्वे स्टॉकपैकी एक आहे. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर आयआरएफसी स्टॉकमध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती. कारण गुंतवणूकदारांना रेल्वे क्षेत्रासाठी भरीव निधीची अपेक्षा होती. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात रेल्वे क्षेत्रासाठी विशेष अशा घोषणा केल्या नाहीत. त्यामुळे या कंपनीच्या शेअरच्या किमतीत लक्षणीय घट पाहायला मिळाली होती.
आयआरएफसी स्टॉक BSE-200 इंडेक्सचा भाग आहे. 2024 या वर्षात आयआरएफसी स्टॉक आतापर्यंत 83 टक्के मजबूत झाला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 400 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 802 टक्क्यांनी वाढली आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,40,852.57 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.