
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉक 30 जुलै रोजी 4 टक्क्यांच्या वाढीसह 25.69 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. 2024 या वर्षात येस बँकेचे शेअर्स 14 टक्क्यांनी वाढले आहेत. नुकताच या बँकेने आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या बँकेचे एकूण बाजार भांडवल 80510 कोटी रुपये आहे. ( येस बँक अंश )
या बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 32.81 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 14.10 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी येस बँक स्टॉक 0.98 टक्के घसरून 26.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
एप्रिल ते जून 2024 या तिमाहीत येस बँकेचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 46.7 टक्क्यांनी वाढून 502 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत येस बँकेने 343 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मार्च 2024 तिमाहीत येस बँकेने 452 कोटी रुपये नफा कमावला होता. म्हणजेच तिमाही आधारावर येस बँकेच्या निव्वळ नफ्यात 11.2 टक्क्यांची वाढ झाली आहे. जून तिमाहीत येस बँकेच्या ताळेबंदात वार्षिक आधारावर 14.6 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. तसेच क्रेडिट ठेवीचे गुणोत्तर मागील तिमाहीतील 85.5 टक्क्यांच्या तुलनेत 86.6 टक्के वाढले आहे.
ICICI सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, येस बँक स्टॉकमध्ये घसरण होऊ शकते. 22 जुलै 2024 रोजी तज्ञांनी आपल्या अहवालात येस बँक स्टॉकवर SELL रेटिंग देऊन 20 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली होती. येस बँकेचा ओपेक्स आणि क्रेडिट खर्च QoQ आधारावर कमी झाला आहे. तसेच इतर उत्पन्न कमी झाल्यामुळे RoA स्थिर राहिला आहे. ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे की येस बँकेचा CET 113.3 टक्के असून बँकेवर सध्या RIDF गुंतवणूकीचा भार एकूण मालमत्तेच्या 11 टक्के आहे.
येस बँक स्टॉक सध्या आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या सिंपल मूव्हिंग अॅव्हरेजेस किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहे. या स्टॉकचा 14 दिवसीय RSI 56.47 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरसोल्ड किंवा ओव्हरबॉट झोनमध्ये ट्रेड करत नाही. मागील एका महिन्यात येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 7 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या बँकेच्या शेअर्सची किंमत 51 टक्के वाढली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.