Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर्स खरेदी करा, कमाईची मोठी संधी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा

Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने आपले जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. जून तिमाहीत टाटा स्टील कंपनीने मागील वर्षीच्या तुलनेत 75 टक्क्यांच्या वाढीसह 918.57 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आज शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 2.86 टक्के घसरून 158.39 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( टाटा स्टील कंपनी अंश )

मागील आर्थिक वर्षात याच तिमाहीत कंपनीने 524.85 कोटी रुपये नफा कमावला होता. जून तिमाहीत टाटा स्टील कंपनीचे एकूण उत्पन्न 55,031.30 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 60,666.48 कोटी रुपये कमाई केली होती. जून 2023 तिमाहीत टाटा स्टील कंपनीचा खर्च 58,553,25 कोटी रुपये होता, जो जून 2024 मध्ये 52,389.06 कोटींवर आला आहे.

नुकताच टाटा स्टील कंपनीच्या संचालक मंडळाने टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडची उपकंपनी असलेल्या TPPL मधील 26 टक्के भागभांडवल खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या योजने अंतर्गत टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेड कंपनी TPPL सोबत शेअर खरेदी करार करून 26 टक्के इक्विटी स्टेक ताब्यात घेणार आहे.

टाटा स्टील लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरूवारी 1 टक्क्यांच्या वाढीसह 166 रुपये किमतीवर पोहचले होते. 18 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 184.60 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचले होते. सेंट्रम ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा मोटर्स स्टॉक पुढील काळात 158 रुपये किमतीवर जाऊ शकतो. प्रभुदास लीलाधर फर्मच्या तज्ञांनी टाटा स्टील स्टॉकवर 186 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Steel Share Price NSE Live 02 August 2024.