12 December 2024 3:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स
x

BEL Share Price | PSU बीईएल स्टॉकसाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मजबूत परतावा देणार

BEL Share Price

BEL Share Price | बीईएल कंपनीने सोमवारी आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. त्यानंतर मंगळवारी हा स्टॉक एक टक्क्यांच्या वाढीसह 325 रुपये किमतीवर पोहचला होता. जून तिमाहीत उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे जेफरीज आणि UBS या सारख्या जागतिक ब्रोकरेज फर्मने बीईएल स्टॉकची टारगेट प्राइस वाढवली आहे. ( बीईएल कंपनी अंश )

मंगळवारी बीईएल स्टॉकमध्ये 1.90 कोटी शेअर्सची ट्रेडिंग झाली होती. या कंपनीचे शेअर्स 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या SMA किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहे. आज शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी बीईएल स्टॉक 2.27 टक्के घसरणीसह 304.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

जून तिमाहीत बीईएल कंपनीचा निव्वळ नफा 776.14 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 530.84 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तिमाही आधारावर कंपनीचा निव्वळ नफा 55 टक्क्यांनी घसरला आहे. मार्च तिमाहीत या कंपनीने 1,783.5 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

बीईएल कंपनीचा ऑपरेशनल वार्षिक महसूल 19.6 टक्क्यांच्या वाढीसह 4,198.77 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 3,510.84 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. जून तिमाहीत बीईएल कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 76,700 कोटी रुपये नोंदवला गेला होता. बीईएल कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये 3 वर्ष कालावधीची 56,500 कोटी रुपये मूल्याची निर्यात ऑर्डर पाइपलाइन आहे.

जेफरीज फर्मच्या तज्ञांनी बीईएल स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन 370 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 20 टक्के अधिक वाढू शकतो. UBS फर्मने देखील बीईएल स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच तज्ञांनी या स्टॉकवर 340 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BEL Share Price NSE Live 02 August 2024.

हॅशटॅग्स

BEL Share Price(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x