
Salary Account Alert | जर तुम्हीही सॅलरी अकाऊंट वापरत असाल तर तुम्हाला काही गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. एखाद्या संस्थेत काम करताना कर्मचाऱ्यांसाठी पगाराचे खाते उघडले जाते. पण तुम्हाला माहित आहे का तुम्हाला पगार खात्यातून बँकेकडून किती फायदे मिळतात? प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नावे पगाराचे खाते असते, ते त्याला स्वत: चालवावे लागते.
सॅलरी अकाऊंटला लागू होणारे नियम
सॅलरी अकाऊंटला लागू होणारे नियम इतर बचत खात्यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. सॅलरी अकाऊंटमध्ये मिनिमम बॅलन्सची गरज नसते, पण जर तुम्ही काही कारणास्तव नोकरी सोडली असेल, तीन महिने पगार त्या खात्यात जमा झाला नसेल तर त्याचे जनरल अकाउंटमध्ये रुपांतर केले जाते. ज्यानंतर ते सामान्य बचत खात्याप्रमाणे आकारले जाते. अशा अनेक बँका आहेत ज्या आपल्या ग्राहकांसोबत सॅलरी अकाऊंटवरील फायदे शेअर करतात.
जर तुमचं सॅलरी अकाऊंट असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा
नोकरी किंवा खाते बदलल्यानंतर जर तुम्ही पगार खाते बंद केले नाही तर त्यात मिनिमम बॅलन्स ठेवा. तसे न केल्यास बँक त्या बचत खात्यावर मेंटेनन्स फी किंवा दंड आकारू शकते. एका बँकेतून दुसऱ्या बँकेत खाते बदलण्यासाठीही बँका वेतन खात्याच्या बाबतीत प्रक्रिया सोपी ठेवतात. अर्थात त्यात त्यांनी काही अटी नक्कीच घातल्या. पगार उघडण्यासाठी तुम्ही कॉर्पोरेट संस्थेत कर्मचारी असणे आवश्यक आहे. तसेच, कंपनीच्या त्या बँकेशी तुमचे वेतन खात्याचे संबंध असणे महत्वाचे आहे. याशिवाय ग्राहकांचे एकाच बँकेत दुसरे कोणतेही खाते नसावे.
सॅलरी अकाऊंटवर उपलब्ध आहेत ‘या’ सुविधा
पगार खाते ठेवल्यावर बँक तुम्हाला पर्सनलाइज्ड चेकबुक देते, ज्यावर प्रत्येक चेकवर तुमचे नाव छापलेले असते. तुम्ही बिल भरण्याची सेवा घेऊ शकता, अन्यथा फोन किंवा इंटरनेटद्वारे पेमेंट करू शकता. बँका सेफ डिपॉझिट लॉकर, स्वीप-इन, सुपर सेव्हर सुविधा, फ्री पेबल-एट-पर चेकबुक, फ्री इन्स्टाअलर्ट, फ्री पासबुक आणि फ्री ईमेल स्टेटमेंट सारख्या सुविधा देखील देतात.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.