 
						SBI Bank Account | सरकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य व्यक्तींना घेता यावा यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली जनधन योजना सुरू केली होती. या योजनेचा अनेकांनी लाभ देखील घेतला. या योजनेची खास गोष्ट म्हणजे तुम्हाला या अकाउंटमध्ये झिरो बॅलन्स अकाउंटची सुविधा मिळते.
यामध्ये तुम्ही एक रुपयाही न भरता तुमचं खातं सुरू ठेवू शकता. जनधन योजनेप्रमाणेच SBI ची ही झिरो बॅलेन्स अकाउंट योजना तुम्हाला माहित आहे का?. या योजनेअंतर्गत तुम्हाला या पाच फायद्यांचा उपभोग घेता येणार आहे. चला तर जाणून घेऊया एसबीआयच्या या भन्नाट योजनेबद्दल.
एसबीआयच्या या बँक अकाउंटचं नाव (Basic Savings Bank Deposit Account) असं आहे. यामध्ये तुमचा मिनिमम बॅलेन्स नसला तरीसुद्धा अकाउंट सुरू राहणार आहे. या अकाउंटची खास गोष्ट म्हणजे तुम्ही यामध्ये जॉईंट अकाउंट देखील उघडू शकता. ज्या व्यक्तीकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड असेल त्यांना हे अकाउंट ओपन करण्यासाठी कोणतीच अडचण निर्माण होणार नाही. सोबतच तुमचं केवायसी डॉक्युमेंट देखील पूर्ण असलं पाहिजे.
हे पाच फायदे देखील अनुभवायला मिळतील :
1. या झिरो बॅलन्स अकाउंटमध्ये तुम्हाला आधार कार्डचा वापर करून सेविंग अकाउंट प्रमाणेच मनी ट्रान्सफर आणि पैसे काढायला जमणार आहेत.
2. तुम्हाला तुमचं झिरो बॅलन्स अकाउंट बंद करायचं असेल तर तुमच्याकडून कोणतीही फी आकारण्यात येणार नाही. तसेच तुम्हाला NEFT आणि RTGS यांसारख्या इलेक्ट्रॉनिक चायनलमधून कॅश ट्रांजेक्शन करण्यासाठी देखील फी घेतली जाणार नाही. सोबतच यामध्ये युपीआय ट्रांजेक्शन देखील शामिल आहे.
3. या खात्यात तुम्ही तुम्हाला हवी तेवढी रक्कम ठेवू शकता.
4. तुम्हाला या खात्याचं फ्री चेकबुक दिलं जात नाही परंतू, बँक पासबुक, एटीएम-कम-डेबिट कार्ड, इंटरनेट, मोबाईल आणि बँकिंगची सुविधा देण्यात येते.
5. महत्त्वाचं म्हणजे या खात्यात इतर बँक अकाउंटप्रमाणे मिनिमम बॅलेन्स मेंटेन न केल्यामुळे पेनल्टी चार्ज द्यावा लागतो. परंतु या खात्यामध्ये पेनल्टी द्यावी लागत नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		