
SBI Bank Special FD | अनेकजण आपले पैसे गुंतवण्यासाठी सरकारी योजनांचा लाभ घेतात. म्युचल फंड, एफडी येथे देखील पैसे गुंतवतात. आज आम्ही तुम्हाला एसबीआयच्या 3 एफडी स्कीम बद्दल माहिती सांगणार आहोत. ज्यामध्ये वरिष्ठ नागरिकांना एसबीआय एफडी योजनेच्या एफडींचा जास्त फायदा अनुभवता येणार आहे. एसबीआयने अमृत कलश आणि वी केअर यांसारख्या योजना देखील सुरू केल्या होत्या.
यामधील वी केअर ही योजना फक्त वरिष्ठांसाठीच आहे तर, अमृत कलश योजनेचा लाभ सामान्य नागरिकांपासून ते वरिष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना घेता येऊ शकतो. दरम्यान एसबीआयची अमृत कलश योजना 400 दिवसांपर्यंत चालते. यामध्ये सामान्य नागरिकांसाठी प्रत्येक वर्षी 7.10% तर, वरिष्ठ नागरिकांसाठी 7.60% जास्त व्याजदराने इंटरेस्ट घेता येऊ शकतो. ही योजना 12 एप्रिल 2023 पासून सुरू झाली असून, 30 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. आज आपण यांसारख्याच आणखीन तीन योजनांबद्दल जाणून घेणार आहोत.
एसबीआय ग्रीन रुपी टर्म डिपॉझिट :
एसबीआयच्या ग्रीन रुपी टर्म डिपॉझिट या योजनेमध्ये 1111 किंवा 1777 दिवसांपर्यंत 6.65% इंटरेस्ट रेट लागू होतो. तर, 6.40% इंटरेस्ट रेट हा 2222 दिवसांसाठी लागू होतो. या स्कीमची खास गोष्ट म्हणजे वरिष्ठ नागरिक डिपॉझिटवर 7.40% इंटरेस्ट रेट कमवू शकतात. त्याचबरोबर या स्कीममध्ये गुंतवणूक करण्याची कोणतीही सीमा दिली गेलेली नाहीये.
एसबीआय अमृतवृष्टी :
एसबीआय अमृतवृष्टी ही योजना 444 दिवसांची असून सामान्य नागरिकांसाठी जमा झालेल्या रक्कमेवर 7.25% इंटरेस्ट रेट प्रदान करते. त्याचबरोबर वरिष्ठ नागरिकांसाठी 0.50%ने एक्स्ट्रा इंटरेस्ट रेट देते. या स्कीमची शेवटची तारीख 31 मार्च 2025 असून, गुंतवणूकदार केलेल्या डिपॉझिटवर लोन देखील घेऊ शकतात.
एसबीआय सर्वोत्तम :
एसबीआय सर्वोत्तम या स्कीममध्ये वरिष्ठांसाठी सामान्य इंटरेस्ट रेटपेक्षा 0.50% जास्त रेट दिले जाते. अशातच ही योजना दोन वर्षांसाठी 7.4% तर, एका वर्षासाठी 7.10% रेट प्रदान करते. या योजनेमध्ये नॉन कॉलेबल हे ऑप्शन एक करोड ते 3 करोड रुपयांपर्यंत केलेल्या गुंतवणुकीवर मिळते.