
Alok Industries Share Price | मुकेश अंबानींच्या मालकीच्या अनेक कंपन्या भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत. त्यापैकी अनेक कंपन्यांच्या (NSE: ALOKINDS) शेअर्सची किंमत 60 रुपयेपेक्षा कमी आहे. यापैकी प्रमुख कंपन्या म्हणजेच आलोक इंडस्ट्रीज, हॅथवे केबल आणि डेटाकॉम लिमिटेड आणि डेन नेटवर्क्स लिमिटेड आहेत. (आलोक इंडस्ट्रीज कंपनी अंश)
यापैकी आलोक इंडस्ट्रीज ही टेक्सटाईल क्षेत्रात व्यवसाय करणारी कंपनी आहे. तर डेन नेटवर्क्स आणि हॅथवे केबल या दोन्ही कंपन्या टीव्ही ब्रॉडकास्टिंग आणि सॉफ्टवेअर उत्पादन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपन्या आहेत. तज्ञांच्या मते हे शेअर्स गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देऊ शकतात.
आलोक इंडस्ट्रीज :
मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 2.56 टक्के वाढीसह 27.24 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जानेवारी 2024 मध्ये या कंपनीचे शेअर 39.24 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. प्रवर्तकांनी या कंपनीचे 75 टक्के भागभांडवल धारण केले आहे. सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 25 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीकडे या कंपनीचे 40.01 टक्के भागभांडवल आहे. तर जेएम फायनान्शियल ॲसेट्सने या कंपनीचे 34.99 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. आज गुरूवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.78 टक्के घसरणीसह 26.53 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
DEN नेटवर्क्स :
मंगळवारी DEN नेटवर्क्स लिमिटेड कंपनीचे शेअर 4.22 टक्के वाढून 54.88 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जानेवारी 2024 मध्ये या कंपनीचे शेअर 69.40 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहोचले होते. प्रवर्तकानी या कंपनीचे 74.90 टक्के भागभांडवल धारण केले आहे. या कंपनीत रिलायन्स इंडस्ट्रीज इन्व्हेस्टमेंट्स अँड होल्डिंग्स लिमिटेड, रिलायन्स व्हेंचर्स लिमिटेड आणि नेटवर्क 18 मीडिया अॅड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड कंपनीची गुंतवणूक आहे. त्याच प्रमाणे जियो टेलीविजन डिस्ट्रीब्यूशन होल्डिंग्स प्राइवेट लिमिटेड, जियो फ्यूचरिस्टिक डिजिटल होल्डिंग्स प्राइवेट लिमिटेड, 3 फीट जियो डिजिटल डिस्ट्रीब्यूशन होल्डिंग्स प्राइवेट लिमिटेड कंपनीने देखील गुंतवणूक केली आहे. आज गुरूवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.77 टक्के घसरणीसह 53.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
हॅथवे केबल अँड डेटाकॉम लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स मंगळवारी स्टॉक 2 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 27.90 रुपये होती. प्रवर्तकांकडे या कंपनीचे 75 टक्के आणि सार्वजनिक शेअरधारकांकडे 25 टक्के भाग भांडवल आहे. कंपनीच्या प्रवर्तकांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या उपकंपनी जिओ कंटेंट डिस्ट्रिब्युशन होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड, जिओ इंटरनेट डिस्ट्रिब्युशन होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि जिओ केबल आणि ब्रॉडबैंड होल्डिंग यांनी देखील गुंतवणूक केली आहे. आज गुरूवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.34 टक्के घसरणीसह 20.42 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.