
Senco Gold Share Price | आर्थिक दृष्ट्या जागतिक स्तरावर वातावरण नकात्मक झाल्याने सोन्याचे भाव देखील गगनाला भिडणार आहेत. त्यामुळे सामान्य लोकांना सोनं विकत घेणं आता सोपं राहिलेलं नाही. दुसऱ्या बाजूला सोन्याची निर्मिती करणाऱ्या कंपनीचा शेअर मात्र श्रीमंत करू शकतो असं आकडेवारी सांगते आहे. हा शेअर (NSE: SENCO) आहे सेन्को गोल्ड लिमिटेड कंपनीचा. (सेन्को गोल्ड लिमिटेड अंश)
15 महिन्यांत 350% परतावा दिला
सेन्को गोल्ड या ज्वेलरी कंपनीचा स्टॉक वर्षभरापासून मोठा परतावा देत असल्याचं आकडेवारी सांगते आहे. IPO लाँच झाल्या पासून विचार केल्यास, मागील 15 महिन्यांत सेन्को गोल्ड शेअरने गुंतवणूकदारांना 350% परतावा दिला आहेत. या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 1,544 रुपये आहे, तर 52 आठवड्यांची निच्चांकी पातळी 582 रुपये होती. सोमवार दिनांक 07 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 3.24 टक्के घसरून 1,349.90 रुपयांवर ट्रेड करत आहे.
स्टॉक स्प्लिटची घोषणा
दरम्यान, कंपनीने स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा करताच हा शेअर पुन्हा गुंतवणूकदारांच्या फोकसमध्ये आला आहे. सेन्को गोल्ड लिमिटेड कंपनी 10 रुपयांच्या फेल व्हॅल्यूच्या शेअरची 5 रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या 2 शेअर्समध्ये विभागणी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच सेन्को गोल्ड लिमिटेड कंपनी आपले शेअर्स स्प्लिट करत आहे. या कंपनीचा IPO ४ जुलै 2023 रोजी लाँच झाला होता. त्यावेळी शेअर प्राईस 317 रुपये होती. गेल्या आठवड्यात म्हणजे शुक्रवार 7 ऑक्टोबर 2024 रोजी हा स्टॉक 1544 रुपयांवर पोहोचला होता. कंपनीने अजून स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही.
सेन्को गोल्ड लिमिटेड 500 कोटींपर्यंत निधी उभारणार
या कंपनीच्या संचालक मंडळानं क्यूआयपी किंवा विविध योग्य पद्धतींद्वारे 500 कोटी रुपयांपर्यंत निधी उभारण्यास मान्यता दिली आहे. मागील एका महिन्यात या शेअरने गुंतवणूकदारांना 25% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.