
TTML Share Price | आज टाटा ग्रुपच्या टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड या कंपनीचे शेअर्स तेजीत आहेत. बुधवार आणि गुरुवारी सुद्धा TTML शेअर्सची (NSE: TTML) जोरदार खरेदी सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 5.59 टक्के वाढून 83.65 रुपयांवर ट्रेड करत होता. (टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनी अंश)
3100% मल्टिबॅगर परतावा दिला
गुरुवारी TTML शेअर 78.05 रुपयांवर उघडला आणि दुपारपर्यंत 83.65 रुपयांच्या दिवसाच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. विशेष म्हणजे हा शेअरची पाच वर्षांपूर्वी 2.60 रुपये एवढी किंमत होती. या कालावधीत TTML शेअरने गुंतवणूकदारांना 3100% इतका मल्टिबॅगर परतावा दिला आहे.
TTML शेअरची 52 आठड्याची उच्चांकी किंमत 111.40 रुपये होती, तर 52 आठड्याची निच्चांकी किंमत 65.05 रुपये होती. मात्र मागील १ वर्षाचा विचार केल्यास या शेअरने केवळ ११% परतावा दिला आहे. मात्र शेअर बाजारातील गुरुवारच्या तेजीने या शेअरने आज एक दिवसात जवळपास 6% परतावा दिला आहे.
टाटा ग्रुपच्या इतर शेअर्सची सध्याची स्थिती
टाटा ग्रुपच्या इतर शेअर्सच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचा शेअर गुरुवारी 0.48% घसरला आहे. तर टाटा स्टील लिमिटेड कंपनीचा शेअर ०.८२% वधारला आहे. दुसरीकडे, टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचा शेअर २.४७% आणि टीसीएस कंपनीचा शेअर ०.२६% वधारला आहे. विशेष म्हणजे टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये देखील तेजी असून हा शेअर आज २.३१% वधारला आहे.
सेन्सेक्सने 82000 चा टप्पा ओलांडला
आजचा दिवस गुंतवणूकदारांसाठी खास होता. कारण आज शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. गुरुवारी सकाळी ११ वाजता सेन्सेक्स २५७ अंकांनी वधारून ८१७२४ च्या पातळीवर ट्रेड करत होता. तर निफ्टी 64 अंकांनी वधारून 25046 वर होता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.