
EPFO Passbook | केंद्र सरकारद्वारे चालविण्यात येणाऱ्या ईपीएफओ म्हणजे कर्मचारी भविष्य निधी संघटनमधून कर्मचाऱ्यांना वार्षिक स्तरावर चांगले व्याजदर प्रदान केले जात आहे. सध्याच्या घडीला सरकार कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात 8.25% ने व्याजदर देत आहे.
(EPFO) कर्मचारी भविष्य निधी संघटन ही एक अशी संस्था आहे जी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगले व्याजदर प्रदान करून खात्यात रिटायरमेंटपर्यंत करोडोंची रक्कम जमा करून ठेवण्यास मदत करते. सोबतच कर्मचाऱ्यांना ईपीएफओ पेन्शन स्कीमचा लाभ देखील मिळतो. दरम्यान कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ खात्यात कर्मचाऱ्याचा आणि नियोक्ताचा असा दोघांचा मिळून एकएक भाग जमा केला जातो. प्रत्येक महिन्याला ही रक्कम तुमच्या पगाराच्या हिशोबाने ईपीएफ खात्यात जमा होत राहते. समजा तुम्हाला रिटायरमेंटपर्यंत करोडोंची रक्कम जमा करून ठेवायची असेल तर, किती योगदान करावे लागेल. जाणून घ्या.
3 ते 5 करोडोंसाठी किती कॉन्ट्रीब्युशन करावं लागेल :
1) समजा एखाद्या कर्मचाऱ्याला रिटायरमेंटपर्यंत 3 करोडो रुपयांची रक्कम जमा करून ठेवायची असेल तर, 40 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 8,400 योगदान द्यावं लागेल. दिलेल्या व्याजदरानुसार ही रक्कम 3,01,94,804 रुपयांवर येऊन पोहोचेल.
2) ईपीएफ कर्मचाऱ्याला खात्यामध्ये 4 करोड रुपयांची रक्कम जमा करून ठेवायची असेल तर त्याला, 40 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 11,200 रुपयांचं योगदान द्यावं लागेल. जेणेकरून 8.25% व्याजदराने 4,02,59,738 रुपयांचा फंड जमा होईल.
3) त्याचबरोबर एखाद्या कर्मचाऱ्याला 5 करोडोंचा फंड जमा करायचा असेल तर, 40 वर्षांसाठी 12 हजार रुपयांचं योगदान द्यावं लागेल. जेणेकरून मॅच्युरिटी पिरियडपर्यंत कर्मचाऱ्याच्या खात्यात लागू असणाऱ्या व्याजदरानुसार 5,08,70,991 रुपयांची रक्कम जमा होईल.
आपत्कालीन परिस्थिती किंवा गरजेसाठी काढू शकतो फंड :
ईपीएफओ खात्यात योगदान देणारा कोणताही कर्मचारी आपत्कालीन परिस्थितीसाठी किंवा लग्न, घर खरेदी, उच्च शिक्षणासाठी पैसे अशा अनेक महत्त्वाच्या कारणांसाठी ईपीएफ खात्यातून पैसे काढू शकतात. ज्याला इमर्जन्सी फंड असं देखील म्हणतात.
अशा पद्धतीने चेक करा ईपीएफ बॅलेन्स :
तुम्हाला तुमच्या ईपीएफ खात्यातील बॅलन्स घरबसल्या चेक करायचं असेल तर, तुमचा मोबाईल नंबर ईपीएफ खात्याशी लिंक असायला हवा. अशा पद्धतीने तुम्ही 9966044425 या दिलेल्या क्रमांकावर मिस कॉल देऊन ईपीएफ बॅलन्स चेक करू शकता. त्याचबरोबर तुम्ही उमंग ॲपद्वारे देखील ईपीएफ खात्यातील बॅलन्स रक्कम चेक करू शकता.