
EPFO Passbook | कर्मचारी भविष्य निधी संघटन ही एक एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट ऑर्गनायझेशन फंड ईपीएफओच्या अंतर्गत चालवली जाणारी संस्था आहे. ही संस्था ईपीएफ कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटनंतर चांगला निधी जमा करून ठेवण्यासाठी सोबतच निवृत्तीनंतरच आयुष्य सुखद आणि आरामात जाण्यासाठी बनवण्यात आली आहे.
सर्वसामान्यांचा विचार करून बनवली गेलेली ही संस्था ईपीएफ खात्यातून तुम्हाला करोडपती देखील बनवू शकते. तुमचं सध्याचं वय 25 वय वर्ष असून 18 हजार बेसिक सॅलरी असेल तर, तुम्हाला रिटायरमेंटपर्यंत 1 करोड देखील मिळू शकतात. एक करोड रुपयांची मोठी रक्कम जमा होण्यासाठी तुम्हाला अधून मधून पैसे काढता येणार नाहीत. नाहीतर तुम्ही करोडो रुपयांचा फंड कधीही जमा करू शकणार नाही.
ईपीएफ अकाउंटमधील गुंतवणुकीचे काही नियम जाणून घ्या :
प्रत्येक कर्मचाऱ्याला आपल्या पगारातून 12% म्हणजेच महागाई भत्ता आणि बेसिक पगारातील 12% योगदान द्यावे लागते. सरकार ईपीएफ खातेधारकांना सध्याच्या घडीला 8.25% व्याजदर प्रदान करत आहे. कर्मचाऱ्या एवढेच योगदान एम्प्लॉयरकडून देखील करण्यात येतं. कंपनीकडून 8.33% ईपीएसमध्ये म्हणजेच पेन्शन फंडमध्ये जमा केले जाते. अशातच कंपनीकडून ईपीएफमध्ये केलं जाणारे योगदान हे 3.67% असते.
वय 25 वर्ष आणि बेसिक सॅलरी 18,000 तर कॅल्क्युलेशन पहा :
1) कर्मचाऱ्याचे वय – 25 वर्ष
2) रिटायरमेंटचे वय वर्ष – 60 वर्ष
3) प्रति वर्ष इन्क्रिमेंट – 5%
4) बेसिक सॅलरी +DA – 18,000
5) कंपनीकडून होणारे योगदान – 3.67%
6) कर्मचाऱ्याकडून होणारे योगदान – 12%
7) पीएफवर मिळणारे वार्षिक व्याज – 8.25%
8) एकूण जमा रक्कम – 32,43,777
9) रिटायरमेंटपर्यंत जमा होणारा फंड – 1,30,35,058.
वय 30 वर्ष आणि बेसिक सॅलरी 30,000 रुपये तर, कॅल्क्युलेशन पहा :
1) कर्मचाऱ्याचे वय – 25 वर्ष
2) रिटायरमेंटचे वय – साठ वर्ष
3) कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार + डीए – 30,000
4) प्रति वर्ष इन्क्रिमेंट – 5%
5) कर्मचाऱ्याकडून होणारे योगदान – 12%
6) कंपनीकडून होणारे योगदान – 3.67%
7) पीएफवर मिळणारे व्याज – 8.25% प्रतिवर्ष
8) एकूण कॉन्ट्रीब्युशन – 54,06,168
9) रिटायरमेंटपर्यंत जमा होणारा फंड – 2,17,24,737 रुपये.