
Post Office Scheme | पोस्टाची योजना ही चांगल्या परताव्यासाठी ओळखली जाते. अनेकजण पोस्टामध्ये वेगवेगळ्या योजनांकरिता खाते उघडून लाभ घेत आहेत. दरम्यान तुम्ही पोस्टाच्या आरडी म्हणजेच रेकरींग डिपॉझिट या योजनेमध्ये केवळ 300 रुपयांची गुंतवणूक करून 17 लाखांपेक्षा अधिक फंड जमा करू शकता. चला तर मग जाणून घेऊया योजनेबद्दलची माहिती.
योजनेचा टाईम पिरियड :
पोस्टाच्या आरडी योजनेचा कार्यकाळ 5 वर्षांसाठीचा दिला गेला आहे. म्हणजेचं पाच वर्षानंतर आरडी स्कीम मॅच्युअर होणार. योजनेची विशेष गोष्ट म्हणजे तुम्ही केवळ 100 रुपयांपासून पोस्टाच्या अकाउंटमध्ये गुंतवणूक करू शकता. पैसे भरण्याची जास्तीत जास्त लिमिट दिली गेली नाहीये त्यामुळे तुम्ही तुम्हाला हवे तेवढे पैसे गुंतवून चांगला फंड जमा करू शकता. त्याचबरोबर योजनेमध्ये 6.7% ने व्याजदर प्रदान केले जाते.
300 रुपये गुंतवून 17 लाखांचा फंड कसा तयार होईल :
तुम्हाला असा प्रश्न नक्कीच पडला असेल की, केवळ 300 रुपयांची गुंतवणूक करून तब्बल 17 लाखांचा फंड कसा काय तयार करता येईल बरं. तर, तुम्हाला प्रत्येक दिवसाला 300 रुपये जमा करायचे आहेत. महिन्याच्या हिशोबाने ही रक्कम 10,000 एवढी होईल. दरम्यान संपूर्ण एका वर्षात सातत्याने गुंतवणूक केली तर, 1.20 लाख रुपये जमा होतात. 6.7% व्याजदराप्रमाणे 5 वर्षांमध्ये तुमचा एकूण फंड 5,99,400 रुपये जमा होतो. म्हणजेच व्याजदराने तुम्ही 1 लाख रुपयांचा फंड मिळवता.
याचाच अर्थ 5 वर्षांच्या मॅच्युरिटी टाईमपर्यंत तुमच्या खात्यात 7,14,827 रुपयांचा तगडा फंड जमा होईल. अशातच ही स्कीम तुम्ही पुढील 5 वर्षांसाठी आणखीन सुरू ठेवली तर, 10 वर्षांत 12 लाख रुपये जमा होतील. जेणेकरून तुम्हाला 17 लाखांचा फंड जमा करण्यापासून कोणीही थांबू शकत नाही.
200 रुपयांच्या गुंतवणुकीवर किती परतावा मिळेल :
समजा तुम्ही पोस्टाच्या आरडी अकाउंटमध्ये 222 रुपयांची गुंतवणूक करत असाल तर, महिन्याला 6,600 रुपये जमा होतात. म्हणजेच संपूर्ण एका वर्षात 81 हजारो रुपये जमा होतील. 6.7% च्या व्याजदरानुसार तुम्हाला व्याजाची रक्कम म्हणून तब्बल एक लाख रुपये मिळतील. दरम्यान तुम्ही आणखीन पाच वर्षांसाठी योजनेला पुढे सुरू ठेवलं तर 10 वर्षांमध्ये 7 लाखांचा मोठा फंड जमा करू शकता. म्हणजेच बरोबर दहा वर्षांनंतर तुमच्या हातात 10 लाखांची भली मोठी रक्कम येईल. ज्या व्यक्तींना भविष्यासाठी चांगला निधी जमा करायचा असेल त्यांनी पोस्टाच्या योजनेचा विचार नक्की करावा.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.