
Vedanta Share Price | वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअरने गुंतवणूदारांना मल्टिबॅगर परतावा दिला आहे. तसेच कंपनी गुंतवणूकदारांना डिव्हीडंड (NSE: VEDL) केव्हा देणार याची प्रतीक्षा आहे. कारण वेदांता लिमिटेड कंपनीने काही दिवसांपूर्वी चौथा अंतरिम लाभांश देणार असल्याचे जाहीर केले होते. कंपनीने त्यासाठी १६ ऑक्टोबर ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली होती. त्यांनतर काही नवीन घडामोडींमुळे वेदांता लिमिटेड कंपनीने संचालक मंडळाची बैठक रद्द केली होती. शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1 टक्के वाढून 476.85 रुपयांवर पोहोचला होता. (वेदांता लिमिटेड कंपनी अंश)
एमके ग्लोबल ब्रोकरेज फर्म – ‘BUY’ रेटिंग
वेदांता लिमिटेड कंपनी शेअरसाठी तज्ज्ञांनी तेजीचे संकेत दिले आहेत. भविष्यात वेदांता लिमिटेड कंपनीचा शेअर मोठा परतावा देऊ शकतो असा विश्वास स्टॉक मार्केट तज्ज्ञांना आहे. एमके ग्लोबल ब्रोकरेज फर्मने वेदांता लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. एमके ग्लोबल ब्रोकरेज फर्मने वेदांता लिमिटेड कंपनी शेअरसाठी 600 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.
कंपनी संचालक मंडळाची बैठक
वेदांता लिमिटेड कंपनीने सर्वप्रथम आर्थिक वर्ष २०२५ साठी चौथ्या अंतरिम लाभांशाची शिफारस करण्यासाठी संचालक मंडळाची बैठक बोलावली होती आणि त्यानंतर ९ ऑक्टोबरपर्यंत तारीख पुढे ढकलली होती. प्रथम ही बैठक ८ ऑक्टोबरला होणार होती. मात्र, त्यानंतर वेदांताने संचालक मंडळाची बैठक पूर्णपणे रद्द करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर चौथ्या अंतरिम लाभांशासाठी निश्चित केलेली १६ ऑक्टोबरची रेकॉर्ड तारीख सुद्धा रद्द केली होती. त्यामुळे वेदांताचे शेअर्स १६ ऑक्टोबरला एक्स-डिव्हिडंड झाले नाहीत.
एमके ग्लोबल ब्रोकरेज फर्म
एमके ग्लोबल ब्रोकरेज फर्मने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, “आम्ही वेदांता लिमिटेड शेअरवर 600 रुपयाच्या टार्गेट प्राईस सह ‘BUY’ रेटिंग देत आहोत. याचा अर्थ शेअरच्या किंमतीत 21% वाढ अपेक्षित आहे. तसेच 9% लाभांश यील्डमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूण 30% परतावा अपेक्षित आहे असं एमके ग्लोबल ब्रोकरेज फर्मने म्हटलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.