 
						Post Office Scheme | पोस्टाने आतापर्यंत मध्यमवर्गीय व्यक्तींसाठी अनेक योजना सुरू केले आहेत. यामध्ये रिटायरमेंट स्कीमपासून ते महिला सक्षमीकरण योजनांचा समावेश पाहायला मिळतो. आज आपण पोस्टाच्या एकूण 7 योजनांविषयी माहिती जाणून घेणार आहोत. जेणेकरून तुम्हाला योग्य व्याजदराची माहिती होऊन आपण कोणता योजनेमध्ये पैसे गुंतवावे हे समजेल.
1) MSSC – महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट : 
पोस्टाची महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट ही योजना अतिशय भन्नाट योजना आहे. आतापर्यंत लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून केवळ पैसे गुंतवून व्याजदरानेच महिला लखपती बनत आहेत. या योजनेमध्ये पैसे गुंतवल्यानंतर सरकार तुम्हाला 7.5% दराने व्याजदर प्रदान करते.
2) Post Office FD 
पोस्टअंतर्गत एफडी योजना देखील राबवली जाते. या योजनेमध्ये तुम्हाला दीर्घकाळासाठी चांगला निधी जमा करायचा असेल तर तुम्ही हा गुंतवणुकीचा पर्याय नक्कीच निवडू शकता. पोस्टाची एफडी योजना तुम्ही 1, 2 ,3 आणि पाच वर्षांसाठी सुरू ठेवू शकता. महत्त्वाचं म्हणजे या योजनेमध्ये तुम्हाला कर सवलतीचा लाभ अनुभवता येतो सोबतच या योजनेमध्ये तुम्हाला 7.5% टक्क्यांच्या हिशोबाने आणि गुंतवणुकीनुसार व्याजदर दिले जाते
3) KVP – किसान विकास पत्र :
‘किसान विकास पत्र’ नावाची पोस्टाची योजना मध्यमवर्गीय नागरिकांसाठी अत्यंत फायद्याची योजना आहे. या योजनेमध्ये तुम्ही दीर्घकाळापर्यंत गुंतवणूक करून भविष्यामध्ये व्याजदरानेच चांगली रक्कम कमावू शकता. योजनेत 115 दिवसानंतर तुमची रक्कम डबल होते ज्यामुळे तुम्हाला जास्तीचा लाभ मिळतो. योजनेचे सध्याचे व्याज 7.5% आहे.
4) SCSS – सिनिअर सिटीजन सेविंग स्कीम :
‘सिनियर सिटीजन सेविंग स्कीम’ ही पोस्टाची आतापर्यंतची सर्वात चालली जाणारी योजना आहे. बरेच ज्येष्ठ नागरिक सीनियर सिटीजन सेविंग स्कीमचा प्रचंड लाभ घेत आहे. या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिक एकूण 5 वर्षापर्यंत गुंतवणूक करू शकतात. त्याचबरोबर योजनेचे व्याजदर 8.2% आहे. व्याजदर जास्त असल्यामुळे व्याजाची रक्कम देखील दुपटीने तुमच्या खात्यात जमा होते.
5) NSC – नॅशनल सेविंग सर्टिफिकेट :
‘नॅशनल सेविंग सर्टिफिकेट’ ही योजना देखील तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर योजना ठरू शकते. कारण की या योजनेमध्ये देखील तुम्ही पाच वर्षांसाठी गुंतवणूक करून 7.7% व्याजदराने मालामाल बनू शकता.
6) SSY – सुकन्या समृद्धी योजना :
‘सुकन्या समृद्धी योजना’ तुमच्या लेकी-बाळींसाठी जबरदस्त योजना ठरू शकते. या योजनेबद्दल तुम्ही तुमच्या लेकीच शिक्षण त्याचबरोबर तिचं लग्न अगदी थाटामाटात लावू शकता. त्याचबरोबर उच्च शिक्षणासाठी देखील पैशांची चिंता करण्याची गरज तुम्हाला वाचणार नाही. कारण की पोस्टाच्या SSY या योजनेमध्ये 8.2% हिशोबाने व्याजदर दिले जाते. त्याचबरोबर या योजनेमध्ये तुम्ही एकूण 15 वर्षांकरिता गुंतवणूक करू शकता. ही स्कीम 21 व्या वर्षी मॅच्युअर होते. त्याचबरोबर गुंतवणुकीची लिमिट सांगायची झाली तर, कमीत कमी 250 रुपयांपासून गुंतवणूक करून 1.50 लाखांपर्यंत करू शकता. दिली गेलेली गुंतवणुकीची लिमिट केवळ एका वर्षासाठीची आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		