
SBI Bank Account | सध्याच्या घडीला अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांचेच बँकेमध्ये स्वतःचे खाते आहे. बहुतांश बँकांमध्ये मिनिमम बॅलन्स अकाउंटचा मोठा प्रॉब्लेम नागरिकांना सहन करावा लागतो. बँक खात्यात मिनिमम बॅलन्सपेक्षा कमी पैसे असतील तर बँक तुमच्याकडून पेनल्टी चार्ज वसूल करते. त्यामुळे बऱ्याच बँक धारकांना अकाउंटमध्ये बॅलन्स मेंटेन ठेवावाच लागतो.
परंतु आता चिंता करण्याची काहीही गरज नाही एसबीआयमध्ये सर्वसामान्यांकरिता झिरो बॅलन्स अकाउंटची सुविधा देखील आहे. झिरो बॅलेन्स अकाउंटच्या सुविधेमधून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे चार्जेस वसूल करण्यात येणार नाही. या सुविधेला बेसिक सेविंग बँक डिपॉझिट अकाउंट असं देखील म्हणतात. या झिरो बॅलन्स अकाउंटचे नेमके कोणते फायदे आहेत जाणून घेऊया.
1) एसबीआयच्या झिरो बॅलन्स अकाउंटमध्ये बॅलन्स मेंटेन ठेवण्याची कोणतीही लिमिट दिली गेली नाहीये. याचाच अर्थ तुमच्या खात्यात झिरो बॅलन्स असले तरीसुद्धा तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे पेनल्टी चार्ज घेण्यात येणार नाही.
2) एसबीआयच्या झिरो बॅलन्स खात्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त कितीही अमाऊंट ठेवू शकता. यामध्ये मॅक्झिमम बॅलन्सची कोणतीही लिमिट दिली गेली नाहीये.
3) एसबीआयच्या झिरो बॅलन्स खात्यामध्ये RTGS आणि NEFT सारख्या इलेक्ट्रॉनिक चायनल मधील कॅश ट्रांजेक्शनवर कोणत्याही प्रकारचे चार्जेस द्यावे लागत नाहीत. एवढेच नाही तर या झिरो बॅलन्स अकाउंटची आणखीन एक खासियत आहे ती म्हणजे तुम्ही एखादं बंद खातं पुन्हा नव्याने सुरू करत असाल तर, तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे चार्जेस घेतले जात नाही. त्याचबरोबर अकाउंट क्लोज करताना देखील तुमच्याकडून चार्जेस घेतले जात नाही.
4) झिरो बॅलन्स अकाउंट उघडल्यानंतर तुम्ही सामान्य सेविंग अकाउंट प्रमाणेच आधार कार्डने झिरो बॅलेन्स खात्यातून पैसे काढू शकता. एखाद्या तुम्ही यूपीआयच्या माध्यमातून देखील पैसे काढू शकता.
5) झिरो बॅलन्स खात्यामध्ये फ्री चेकबुक दिले जात नाही परंतु बेसिक रूपे एटीएम-कम-डेबिट कार्ड, मोबाईल आणि इंटरनेट, बँकेचे पासबुक यांसारख्या सुविधा दिल्या जातात.
खातं उघडण्यास कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत :
ज्या व्यक्तीने केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असेल असा कोणताही व्यक्ती झिरो बॅलन्स खातं अगदी आरामशीर उघडू शकतो. त्याचबरोबर पॅन कार्ड आणि आधार कार्ड यांसारख्या डॉक्युमेंट्समुळे देखील खात उघडणे असं सोपं जाईल. या खात्यात दोन व्यक्तींचे जॉईंट खाते देखील उघडू शकता. परंतु यासाठी अकाउंट होल्डरला त्याचे संपूर्ण डॉक्युमेंट बँकेमध्ये जमा करावे लागतील.
काही नियम आणि अटी जाणून घ्या :
समजा तुम्हाला बँकेमध्ये झिरो बॅलन्स अकाउंट उघडायचं असेल तर, त्या बँकेमध्ये तुमचं सेविंग अकाउंट नसलेलं पाहिजे. समजा तुमचं पहिल्यापासूनच सेविंग अकाउंट असून, झिरो बॅलन्स अकाउंट देखील उघडलं असेल तर, सर्वातआधी तुम्हाला 30 दिवसांआधीच सेविंग अकाउंट बंद करावे लागेल जेणेकरून झिरो बॅलन्स अकाउंट उघडू शकाल.