30 May 2023 12:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Symphony Share Price | कुलर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने 3,00,000 टक्के परतावा दिला, 1 लाखाच्या गुंतवणुकीचे झाले 30 कोटी, स्टॉक डिटेल्स Money Saving Tips | पैसे हाताशी थांबत नाहीत का? फॉलो करा या 8 टिप्स आणि आयुष्यातील आर्थिक बदल पहा शिंदे गट धोक्यात! आज निवडणूक झाल्यास शिंदे यांच्या शिवसेना गटाला केवळ 5.5% मते मिळतील, मनसे सर्वेतही शिक्कल नाही - सर्वेक्षण रिपोर्ट Adani Enterprises Share Price | 1 महिन्यात अदानी एंटरप्रायझेस शेअरने 32% परतावा दिला, अदानी स्टॉक तेजीत, ब्लॉकडीलची जादू काय आहे? Axita Cotton Share Price | सुवर्ण संधी! एक्झीटा कॉटन कंपनी 28 रुपयाचा शेअर 56 रुपयांना बायबॅक करणार, रेकॉर्ड डेटच्या आधी फायदा घ्या Bajaj Steel Industries Share Price | बजाज स्टील इंडस्ट्रीज शेअरने गुंतवणूकदारांना 1500 टक्के परतावा दिला, आता 60 टक्के लाभांश देणार Personal Loan | पर्सनल लोन घेताना या नकळत होणाऱ्या चुका टाळा, पर्सनल लोन घेताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे, जाणून घ्या
x

MRF Share Price | करोडपती करणारा 11 रुपयाचा शेअर, 818772% परतावा, 1 लाखावर 82 कोटी रुपये परतावा दिला, स्टॉक डिटेल्स

MRF share price

MRF Share Price | शेअर बाजारात गुंतवणूक करून बक्कळ कमाई करण्यासाठी संयम असणे खूप आवश्यक आहे. जर तुम्ही संयम बाळगला तर दीर्घ काळात शेअर मार्केटमधून तुम्ही चांगली कमाई करू शकता. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका कंपनीच्या शेअरची माहिती देणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. एकेकाळी 11 रुपयावर ट्रेड करणारा करणारा स्टॉक आज देशातील सर्वात महाग शेअर म्हणून ओळखला जातो. आपण ज्या स्टॉक बद्दल बोलत आहोत, त्याचे नाव आहे ‘एमआरएफ लिमिटेड’. सध्या या कंपनीच्या शेअरची किंमत 90,000 रुपये आहे. एमआरएफ ही कंपनी मुख्यतः टायर उत्पादन करण्याचे कॉम करते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, MRF Share Price | MRF Stock Price | BSE 500290 | NSE MRF)

MRF शेअरचा इतिहास :
एप्रिल 1993 मध्ये एमआरएफ कंपनीचे शेअर्स फक्त 11 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ज्या लोकांनी एप्रिल 1993 मध्ये एमआरएफ कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली होती, ते लोक आता करोडपती झाले आहेत. एमआरएफ लिमिटेड म्हणजेच मद्रास रबर फॅक्टरी ही कंपनी 10 रुपये प्रति शेअर या दर्शनी मूल्यासह शेअर बाजारात सूचीबद्ध झाली होती. 27 एप्रिल 1993 रोजी एमआरएफ लिमिटेड कंपनीचे शेअर बीएसई निर्देशांकावर 11 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 20 जानेवारी 2023 रोजी एमआरएफ लिमिटेड कंपनीचे शेअर्स 90,076.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. म्हणजेच मागील 30 वर्षांत एमआरएफ लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 8,18,772 टक्के पेक्षा अधिक नफा कमावून दिला आहे. 7 नोव्हेंबर 2022 रोजी एमआरएफ लिमिटेड कंपनीच्या स्टॉकने 95,954.35 रुपये ही आपली सर्वकालीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. कंपनीचे बाजार भांडवल फक्त 38,212.70 कोटी रुपये आहे.

गुंतवणुकीवर परतावा :
जर तुम्ही एमआरएफ लिमिटेड कंपनीच्या परताव्याचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, जर तुम्ही 30 वर्षांपूर्वी एमआरएफ लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये फक्त 2,000 रुपये लावले असते तर, आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 1.63 कोटी रुपये झाले असते. त्याच वेळी जर तुम्ही 1993 मध्ये स्टॉकवर 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 82 कोटी रुपये झाले असते. भारतीय शेअर बाजारात एमआरएफ लिमिटेड कंपनीचे शेअर्स सर्वात महाग आहेत. या वर्षी YTD आधारे एमआरएफ लिमिटेड स्टॉकमध्ये 2.24 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 21.95 टक्के परतावा कमावून दिला आहे.

MRF कंपनीच्या व्यवसाय थोडक्यात :
चेन्नईस्थित एमआरएफ लिमिटेड ही टायर निर्मिती करणारी बहुराष्ट्रीय कंपनी आहे. एमआरएफ लिमिटेड कंपनीचे पूर्ण नाव ‘मद्रास रबर फॅक्टरी’ असे आहे. एमआरएफ लिमिटेड कंपनी मुख्यतः टायर, ट्रेड, ट्यूब, कन्व्हेयर बेल्ट, पेंट्स, खेळणी तसेच स्पोर्ट्स सामान आणि मोटर स्पोर्ट्स बनवण्याचे काम करते. 1940 मध्ये अवघ्या 14,000 रुपयांच्या भांडवलातून रबर बलून कारखाना म्हणून एमआरएफ लिमिटेड कंपनीची सुरुवात झाली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| MRF Share Price 500290 stock market live on 21 January 2023.

हॅशटॅग्स

MRF share price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x