12 December 2024 9:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

LIC Share Price | एलआयसी शेअरवर नवीन टार्गेट प्राईस जाहीर होताच म्युचुअल फंड कंपन्यांकडून जोरदार स्टॉक खरेदी, फायद्याची अपडेट

LIC Share Price

LIC Share Price | डिसेंबर 2022 मध्ये ‘क्वांट म्युच्युअल फंडाने’ एलआयसी कंपनीचे शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. 31 डिसेंबर 2022 पर्यंत ‘क्वांट म्युच्युअल फंडाच्या’ शेअर होल्डिंग डेटानुसार मागील काही महिन्यात त्यांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये 18 नवीन कंपन्याचे स्टॉक्स जोडले आहेत. आणि एलआयसी कंपनीचे शेअर्स त्यापैकीच एक आहेत. क्वांट म्युच्युअल फंडाने एलआयसी कंपनीचे 49,48,500 शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. क्वांट म्युच्युअल फंडाने एलआयसी या विमा कंपनीचे 0.08 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एलआयसी कंपनीचा शेअर किंचित घसरणीसह 698.30 रुपयांवर क्लोज झाला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Life Insurance Corporation Share Price | Life Insurance Corporation Stock Price | LIC Share Price | LIC Stock Price | BSE 543526 | NSE LICI)

तज्ञांचे मत :
शेअर बाजाराचा मागोवा घेणाऱ्या निरिक्षकांच्या मते, एलआयसी कंपनीच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे, कारण PSU कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणत गुंतवणूक आहे. सरकारी मालकीच्या कंपन्यांच्या शेअर्सनी मागील काळात जबरदस्त कामगिरी केली आहे. शेअर बाजार तज्ञांनी PSU कंपन्यांच्या महसुलात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. शिवाय एलआयसी स्टॉक चार्ट पॅटर्नवर 740 रुपयेच्या पातळीवर V शेप ब्रेक आउट पाहायला मिळत आहे. क्लोजिंग बेसिसवर स्टॉकमध्ये ब्रेकआउट पाहायला मिळाल्यानंतर एलआयसी स्टॉकमध्ये जबरदस्त रॅली येण्याची शक्यता आहे.

एलआयसी कंपनीच्या स्टॉकवर प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीज फर्मचे तज्ञ म्हणतात की,” सरकारी मालकीच्या कंपन्यांमध्ये एलआयसी कंपनीचे शेअर्स चांगले प्रदर्शन करत आहे. अनेक PSU कंपन्यांच्या शेअरने मागील तिमाहीत चांगली कामगिरी केली आहे. “IIFL सिक्युरिटीज फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, एलआयसी कंपनीच्या शेअरच्या चार्ट पॅटर्ननुसार एलआयसी स्टॉक बेस बिल्डिंग मोडमध्ये आहे. एलआयसी स्टॉक 680 रुपये ते 740 रुपये प्रति शेअर या लेव्हलमध्ये ट्रेड करत आहे. जर एलआयसी शेअरने 740 रूपये किमतीवर ब्रेकआउट दिला ते पुढील काळात शेअरची किंमत 900 रुपये ते 950 रुपये किंमत पातळी ओलांडू शकते. ज्यांच्या पोर्टफोलिओमध्ये एलआयसी कंपनीचे शेअर्स आहेत, त्यांनी 680 रुपयेवर स्टॉप लॉस लावून वाट पहावी, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. जर तुम्हाला एलआयसी शेअर खरेदी करायचे असतील तर 740 रुपयेच्या बेस लेव्हलजवळ V शेप ब्रेकआउट दिसण्याची वाट पहावी.

एलआयसी कंपनीचा आयपीओ मे 2022 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आला होता. भारतीय आयुर्विमा कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर मे 2022 मध्ये BSE आणि NSE निर्देशांकावर सूचीबद्ध झाले होते. स्टॉक लिस्ट झाल्यापासून विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहे. एलआयसी कंपनीचे स्टॉक मार्केटमध्ये शेअर्स सवलतीच्या दरात सूचीबद्ध झाले होते. या कंपनीच्या शेअरने NSE निर्देशांकावर 588 रुपये ही आपली नीचांक पातळी स्पर्श केली होती. एलआयसी कंपनीच्या शेअरची किंमत मागील एका वर्षात 20.22 टक्के कमी झाली आहे. 2023 या नवीन वर्षात एलआयसी शेअरची किंमत 1.58 टक्के खाली आली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | LIC Share Price 543526 LICI stock market live on 21 January 2023.

हॅशटॅग्स

#LIC Share Price(104)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x