1 April 2023 10:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRCTC Railway Ticket | अचानक गाव-शहरात ट्रेनने जावं लागतंय अन तिकीट नाही? नो टेन्शन, हा नियम मदत करेल Post Office Scheme | या सरकारी मासिक उत्पन्न योजनेत शून्य रिस्कवर गुंतवणूक करा, दरमहा 4950 रुपये मिळतील, पूर्ण माहिती जाणून घ्या Deep Industries Share Price | हा शेअर स्प्लिट होतोय, शेअरची किंमत पाच पट घटणार, खरेदी करणार? IFL Enterprises Share Price | ही कंपनी गुंतवणुकदारांना दुहेरी फायदा देणार, कंपनीने स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्सची घोषणा Apollo Pipes Share Price | या कंपनीच्या शेअरची किंमत इतक्या तेजीत वाढली की गुंतवणुकदार करोडपती झाले, परतावा पाहून गुंतवणूक करा April Month Horoscope | एप्रिल महिन्यात 12 राशींमध्ये कोणाला नशिबाची साथ? कोणासाठी मोठी संधी? तुमचं मासिक राशीभविष्य वाचा Odysse Vader e-Bike | ओडिसे वडर ई-बाइक लॉन्च, फुल चार्ज वर 125 किमी रेंज, 999 रुपये टोकन देऊन बुक करा
x

Anant Raj Share Price | झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमधील जबरदस्त शेअर, 7 महिन्यांत 180% परतावा दिला, खरेदी करणार?

Anant Raj Share Price

Anant Raj Share Price | ‘अनंतराज लिमिटेड’ या रिअल इस्टेट आणि रेंटल क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स मागील 7 महिन्यांपासून कमालीचे प्रदर्शन करत आहेत. 20 जून 2022 रोजी स्टॉकने 52 आठवड्यांची नीचांक पातळी गाठल्यानंतर स्टॉक मध्ये आता स्थिरता येत आहे. 20 जून 2022 रोजी अनंतराज कंपनीचे शेअर्स 43.20 रुपयांवर ट्रेड करत होते. अनंत राज कंपनीच्या शेअर्समध्ये अजूनही चढ-उतार येऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या कंपनीच्या शेअर्सने शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 125.20 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Anant Raj Share Price | Anant Raj Stock Price | BSE 515055 | NSE ANANTRAJ)

शेअरची किंमत 43 रुपयांवरून वाढून 120 रुपयांवर : अनंत राज कमोनीच्या शेअर्सने मागील काही ट्रेडिंग सेशनमध्ये कमालीची कामगिरी केली आहे, आणि स्टॉकने 52 आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला आहे. या रिअल इस्टेट कंपनीच्या शेअर्सने मंगळवार आणि बुधवारी आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. 20 जून 2022 रोजी अनंत राजचे शेअर्स 43.20 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 20 जानेवारी 2023 रोजी अनंतराज कंपनीचे शेअर्स 120.85 रुपये किमतीवर बंद झाले होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना 15 टक्के परतावा कमावून दिला आहे.

3 वर्षांत 1 लाखावर 14 लाख परतावा :
अनंत राज कंपनीच्या शेअर्सनी मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम नफा कमावून दिला आहे. 22 मे 2020 रोजी अनंत राज कंपनीचे शेअर्स 8.09 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 20 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स बीएसई निर्देशांकावर 120.85 रुपयांवर बंद झाले . जर तुम्ही 22 मे 2020 रोजी अनंत राज कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर, आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 14.93 लाख रुपये झाले असते.

झुनझुनवाला पोर्टफोलिओ : बिग बुल राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये अनंतराज कंपनीचे 10 दशलक्ष शेअर्स आहेत. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीतील अनंत राज लिमिटेड कंपनीचे शेअर होल्डिंग पॅटर्न पाहिले तर आपल्याला समजेल की, राकेश झुनझुनवाला यांच्याकडे अनंत राज कंपनीचे 10 दशलक्ष शेअर्स म्हणजेच 3.09 टक्के भाग भांडवल आहे. डिसेंबर 2022 तिमाहीतील कंपनीच्या शेअर होल्डिंगची आकडेवारी जाहीर होण्यास अवकाश आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Anant Raj Share Price 515055 ANANTRAJ stock market live on 21 January 2023.

हॅशटॅग्स

Anant Raj Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x