
NBCC Share Price | एनबीसीसी लिमिटेड कंपनीचा शेअर फोकसमध्ये आला आहे. शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी NBCC लिमिटेड कंपनी (NSE: NBCC) शेअर 2.27% टक्के घसरून 107.80 रुपयांवर पोहोचला होता. मागील काही दिवसात कंपनी ऑर्डरबुक मजबूत झाली असूनही शेअर घसरत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. (एनबीसीसी लिमिटेड कंपनी अंश)
कंपनी ऑर्डरबुक मजबूत – पण शेअर घसरतोय
एनबीसीसी लिमिटेड कंपनी शेअर १४ ते १८ ऑक्टोबर दरम्यान ५.५ टक्क्यांनी घसरला आहे. या मल्टिबॅगर शेअरने मागील 6 महिन्यात 30.30% परतावा दिला आहे. एकाबाजूला एनबीसीसी लिमिटेड कंपनीची ऑर्डरबुक मजबूत होतं असताना दुसरीकडे शेअर प्राईस घसरत आहे. एनबीसीसी लिमिटेड कंपनीने नुकतेच फ्री बोनस शेअर्स जाहीर केले होते. आता तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना महत्वाचा सल्ला दिला आहे.
कंपनीला दोन मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाले
एनबीसीसी लिमिटेड कंपनीला कासेझ (KASEZ) प्राधिकरणाकडून २५.२५ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. तर १० ऑक्टोबरला एनबीसीसी लिमिटेड कंपनीला झारखंडमधील बोकारो स्टील प्लांटमध्ये डिझाइन, पुरवठा, रूफटॉप सोलर सिस्टीम आणि इन्स्टॉलेशनसाठी १९८ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे.
एक हजार कोटी रुपयांची मोठी ऑर्डर
त्यानंतर एनबीसीसी लिमिटेड कंपनीची उपकंपनी असलेल्या हिंदुस्थान स्टीलवर्क्स कन्स्ट्रक्शन कंपनीला १००० कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. एनबीसीसी लिमिटेड कंपनीच्या उपकंपनीला मिळालेल्या या कॉन्ट्रॅक्टमध्ये महाराष्ट्र गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठतील कॅम्पस डेव्हलपमेंटचा समावेश आहे.
अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्म – रेटिंग जाहीर
ट्रेंडलिन रिपोर्टनुसार, एकूण 4 शेअर बाजार तज्ज्ञांनी एनबीसीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘SELL’ रेटिंग जाहीर केली आहे. या स्टॉक मार्केट विश्लेषकांच्या मते पुढील एक वर्षात NBCC शेअर 14% घसरून 97 रुपयांवर जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मने एनबीसीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘SELL’ रेटिंग दिली आहे. तसेच NBCC शेअर पुढील काळात ३० रुपयांपर्यंत घसरू शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.
शेअरने दिलेला परतावा
एनबीसीसी लिमिटेड कंपनी शेअर मागील ६ महिन्यात 30.30% परतावा दिला होता. मागील एका वर्षात या शेअरने 128.54% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 338.21% परतावा दिला आहे. तर YTD आधारावर एनबीसीसी लिमिटेड कंपनी शेअरने 97.54% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.